पुणेकरांनी जिंकलं! शहरात सध्या एकच कोरोना रुग्ण ऑक्सिजनवर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2022 01:13 PM2022-03-19T13:13:42+5:302022-03-19T13:15:53+5:30

शुक्रवारी दिवसभरात केवळ १२ नवे कोरोनाबाधित ...

single corona patient is currently on oxygen in pune city covid 19 updates | पुणेकरांनी जिंकलं! शहरात सध्या एकच कोरोना रुग्ण ऑक्सिजनवर

पुणेकरांनी जिंकलं! शहरात सध्या एकच कोरोना रुग्ण ऑक्सिजनवर

Next

पुणे : कोरोनाची तिसरी लाट (corona cases in pune decreasing) आता पूर्णत: ओसरली असल्याचे चित्र शहरात दिसून आले आहे. शुक्रवारी केवळ एकाच रुग्णाला ऑक्सिजनची गरज असून, कोणताही कोरोनाबाधित व्हेंटिलेटरवर अथवा आयसीयूमध्ये नाही. शुक्रवारी दिवसभरात केवळ १२ नवे कोरोनाबाधित आढळून आले असून, त्यांनाही सौम्य लक्षणे आहेत.

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी २ हजार ९९ जणांनी कोरोना चाचणी करून घेतली. यापैकी बधितांची टक्केवारी फक्त अर्धा टक्का आहे. शहरातील सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २१७ इतकी असून, यापैकी २.७६ टक्के रुग्णांना रुग्णालयात उपचार घेण्याची आहे. परंतु यापैकी बहुतांशी जण हे अन्य व्याधींनी त्रस्त आहेत व काही जण वयोवृद्ध आहेत.

शुक्रवारी एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू शहरात झालेला नाही. आजपर्यंत शहरात एकूण ४५ लाख ३० हजार २३२ जणांनी कोरोना चाचणी करून घेतली आहे. यापैकी ६ लाख ६१ हजार ६९७ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ६ लाख ५२ हजार १३२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत शहरात ९ हजार ३४८ झाला आहे.

Web Title: single corona patient is currently on oxygen in pune city covid 19 updates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.