डोर्लेवाडीत एकाच दिवसात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:11 AM2021-04-28T04:11:32+5:302021-04-28T04:11:32+5:30
डोर्लेवाडी : डोर्लेवाडी परिसरात कोरोनाने मागील आठ दिवसांपासून चांगलाच धुडगूस सुरूच ठेवला आहे. शुक्रवारी (दि. २४) ...
डोर्लेवाडी : डोर्लेवाडी परिसरात कोरोनाने मागील आठ दिवसांपासून चांगलाच धुडगूस सुरूच ठेवला आहे. शुक्रवारी (दि. २४) एका दिवसात ग्रामपंचायत हद्दीत कोरोनाचे तब्बल १८ रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
गावात एकूण अॅक्टिव्ह रुग्ण ९१ व मृत्यू ७ झाले आहेत. रोज गावामध्ये ७, ८,१०,१७ असे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाकडून वीकेंड लॉकडाऊन, संचारबंदी, जमावबंदीसह अनेक कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. तरी, डोर्लेवाडीमधील नागरिक कोरोना हा मात्र आमच्या हद्दीच येऊच शकत नाही, अशा आविर्भावात व विनामास्क फिरत आहेत. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र आहे.
कोरोना रुग्णांच्या संपर्कातील नातेवाईकांना होम क्वारंटाइन राहण्याबाबत नोटिसा देऊनही ते राजरोसपणे फिरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. गावामध्ये अजून नियम कडक करण्याची अंमलबजावणी करण्याची मागणी जोर धरत आहे.
पॉझिटिव्ह रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी होम क्वारंटाइन होणे गरजेचे आहे. पॉझिटिव्ह रुग्णांनी हॉस्पिटलमधून आल्यानंतर १५-२० दिवस इतर लोकांच्या संपर्कात येऊ नये. सर्दी, ताप, खोकला दोन दिवसांपेक्षा अंगावर काढू नये, ताबडतोब तपासणी करून घ्यावी. लसीकरण जास्तीतजास्त लोकांनी करून घेणे गरजेचे आहे.व्यायाम,चांगला आहार,शांत झोप या दैनंदिन आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी आहेत. मास्क व सॅनिटायझर जास्तीतजास्त वापर करावा.
डॉ. दडस बी. एन.
वैद्यकीय अधिकारी, डोर्लेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र
कोरोना रुग्णासह त्यांच्या नातेवाईकांना होम क्वारंटाइन राहण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली जाईल.
पांडुरंग सलवदे,
सरपंच, ग्रामपंचायत डोर्लेवाडी