एकेक किरण तेजाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:10 AM2021-05-20T04:10:18+5:302021-05-20T04:10:18+5:30

अभिजित कोळपे इन्ट्रो पहिल्या प्रयत्नापासून वरिष्ठ मित्र आणि शिक्षकांच्या सल्ल्यानुसार लेखनाचा सातत्याने सराव केला. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) ...

A single ray of radiance | एकेक किरण तेजाचा

एकेक किरण तेजाचा

Next

अभिजित कोळपे

इन्ट्रो

पहिल्या प्रयत्नापासून वरिष्ठ मित्र आणि शिक्षकांच्या सल्ल्यानुसार लेखनाचा सातत्याने सराव केला. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत प्रत्येक प्रयत्नात त्यामुळे यश मिळाले. या परीक्षेत ''ज्ञाना''बरोबरच वस्तुनिष्ठ दृष्टिकोन (प्रॅक्टिकल अप्रोच) ठेवून सातत्याने ''लेखन'' सराव फार महत्त्वाचा आहे. या बाबींचे तंतोतंत पालन करीत मार्गक्रमण केल्याने सलग तीन परीक्षेत यश मिळाले. पहिल्या प्रयत्नात ५०३ रँक, दुसऱ्या प्रयत्नात ३६१ वी रँक तर चौथ्या प्रयत्नात १५१ वी रँक मिळवत भारतीय पोलीस सेवेत (आयपीएस) निवड झाल्याचे पंढरपूरचे अभयसिंह देशमुख सांगतात. महाराष्ट्र कॅडरमध्येच त्यांची निवड झाली आहे. सध्या हैदराबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल पोलीस प्रशिक्षण संस्थेत त्यांचे प्रशिक्षण सुरू आहे.

पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून सिव्हिल इंजिनिअरिंग या विषयात पदवी मिळवलेले अभयसिंह देशमुख हे मूळचे पंढरपूर तालुक्यातील कासेगावचे. आई-वडील दोघेही शेतकरी. त्यांनी हवे ते करण्यासाठी पहिल्यापासून स्वातंत्र्य आणि भक्कम पाठिंबा दिला. २०१५ ला सिविल इंजिनिअरिंग केल्यानंतर सुरुवातीला एक वर्ष एल अँड टी कंपनीत काम केले. त्यानंतर मित्रांचा सल्ला, मार्गदर्शनात यूपीएससीची तयारी सुरू केली.

ग्रुप स्टडीमुळे ८ जण झाले आयएएस, आयपीएस

अभयसिंह सांगतात, आम्ही ८ मित्रांनी मिळून पुण्यात एक फ्लॅट घेतला होता. बिल्डिंगजवळच अभ्यासिका आणि खानावळ होती. त्यामुळे अनावश्यक वाया जाणारा वेळ वाचायचा. आम्ही सर्व मित्र स्वयं अभ्यासाबरोबरच ग्रुप स्टडी करायचो. सातत्याने चालू-घडामोडी, पूर्व आणि मुख्य परीक्षेतील सी-सॅट, जनरल स्टडीज तसेच वैकल्पिक विषय आदींची तयारी ग्रुप स्टडीमधून करायचो. त्यामुळे वेळेचे बचत होऊन अभ्यासाची गुणवत्ता वाढत होती. त्याचा आमच्या संपूर्ण ग्रुपला फायदा झाला. ग्रुपमधील ५ जणांची भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) तर ३ जणांची भारतीय पोलीस सेवेत (आयपीएस) निवड झाली.

६० प्रश्नपत्रिका सोडवल्या

यूपीएससीची मुख्य परीक्षा ही ‘ज्ञाना’पेक्षा ‘लेखन’ सरावाची परीक्षा अधिक आहे. माझा वैकल्पिक विषय मानववंश शास्त्र होता. मी वैकल्पिक आणि सामान्य अध्ययनाबरोबरच निबंध असे जवळपास ६० प्रश्नपत्रिका सोडवल्या. तसेच प्रत्येक पेपर सोडवल्यानंतर ते वरिष्ठांकडून तपासून घ्यायचो. नंतर रात्री रूमवर मित्रांबरोबर प्रत्येक पेपर सोडवल्यानंतर चर्चा करायचो. त्यामुळे याचा आम्हाला अंतिम परीक्षेत खूप फायदा झाल्याचे अभयसिंह देशमुख सांगतात.

लहान वयात विद्यार्थ्यांवर दबाव टाकू नका; पदवी पातळीवर अभ्यास सुरू करा

आपल्याकडे शालेय किंवा स्पर्धा परीक्षेच्या प्रत्येक पातळीवर विनाकारण ''बाऊ'' केला जातो. मला आजही अनेक पालकांचे फोन येतात. ते म्हणतात आमचा मुलगा अथवा मुलगी आता ८ वी, ९ वीत किंवा १२ वीत आहे, तर यूपीएससीची तयारी कशी करायची. मी त्या सर्वांना हेच सांगतो, की एवढ्या लवकर या परीक्षेची तयारी करायची गरज नाही. सध्या ते जे शालेय स्तरावर आहेत ते व्यवस्थित करू द्या. विनाकारण ''बाऊ'' केल्यास लहान वयात विद्यार्थी दबाव घेतात. त्यामुळे त्यांच्या शालेय पातळीवरच्या परीक्षेवर वाईट परिणाम होतो. मी स्वतः सिविल इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर यूपीएससीची तयारी सुरू केली. तसेच पूर्ण फोकसने अभ्यास केल्याने मला प्रत्येक परीक्षेत यश मिळत गेले. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांवर विनाकारण लहान वयात दबाव टाकू नये, असे अभयसिंह देशमुख सांगतात.

फोटो : अभयसिंह देशमुख (आयपीएस)

(एज्यू कनेक्ट पानासाठी मुलाखत)

Web Title: A single ray of radiance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.