एकेक किरण तेजाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:10 AM2021-05-27T04:10:06+5:302021-05-27T04:10:06+5:30

अभिजित कोळपे इन्ट्रो सुरुवातीच्या दोन प्रयत्नांत अपयशानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मागील काही वर्षांतील विविध विषयांच्या परीक्षेत विचारलेले प्रश्न हे ...

A single ray of radiance | एकेक किरण तेजाचा

एकेक किरण तेजाचा

Next

अभिजित कोळपे

इन्ट्रो

सुरुवातीच्या दोन प्रयत्नांत अपयशानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मागील काही वर्षांतील विविध विषयांच्या परीक्षेत विचारलेले प्रश्न हे जास्त करून शासनाच्या अधिकृत संदर्भ साहित्यातून विचारल्याचे लक्षात आले. मग त्यानुसार नियोजन केले. मुख्यतः National Council of Educational Research and Training अर्थात NCERT च्या दिल्ली बोर्डाच्या पुस्तकातून अभ्यासाला सुरुवात केली. आधीच्या दोन प्रयत्नात भटकलेला फोकस पूर्णतः योग्य दिशेने सुरू झाला. तिसऱ्या प्रयत्नात त्यामुळे पूर्व आणि मुख्य परीक्षा पार करत संपूर्ण देशात ३७६ वी रँक आली. भारतीय आयकर विभागात (आयआरएस) निवड झाली. मात्र पुढे अभ्यास सुरू ठेवला. त्यामुळे २०१५ साली चौथ्या प्रयत्नात १२५ वी रँक प्राप्त झाल्याने भारतीय पोलीस सेवेत (आयपीएस) निवड झाल्याचे मूळच्या लातूर जिल्ह्यातील उदगीरच्या भाग्यश्री बाबूराव नवटके सांगतात. सध्या त्या पुण्यातील सायबर विभागात पोलीस उपायुक्त या पदावर कार्यरत आहेत.

बाजारातील भारंभार कोणत्याही लेखकांची पुस्तके घेण्याऐवजी खात्रीशीर आणि अधिकृत संदर्भ साहित्य यूपीएससीच्या परीक्षेत वापरले तर हमखास यश मिळते, असे भाग्यश्री नवटके सांगतात. मी स्वतः तिसऱ्या आणि चौथ्या प्रयत्नात हे जाणीवपूर्वक केले. कारण अनेक प्रश्नपत्रिकांची तुलना केल्यानंतर यूपीएससी कोणत्या पुस्तकांचा संदर्भ घेते हे लक्षात आले. विद्यार्थ्यांनी या गोष्टींची तुलना केल्यास त्यांना यूपीएससीची परीक्षा आणखी सोपी होईल. त्यामुळे योग्य आणि अधिकृत संदर्भ फार महत्त्वाचे असतात.

---

* वैविध्यपूर्ण प्रश्नांचा सराव गरजेचा

यूपीएससीच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेत विशेषतः इतिहास, भूगोल आणि सामान्य अध्ययन या विषयांच्या पेपरचा सराव जास्तीत जास्त केल्यास फायदा होतो.

१) पूर्व परीक्षा : या परीक्षेत मुख्यतः सातत्याने गणित सोडवण्याचा सराव करणे, Reasioning Ability, Mental Ability तुलनात्मकरीत्या सोडवणे. त्यासाठी किमान दोन महिन्यांचा जास्तीचा कालावधी देऊन सराव करणे आवश्यक आहे.

२) मुख्य परीक्षा : वैकल्पिकचे दोन आणि सामान्य अध्ययनचे चार पेपर असे सहा पेपर सोडवताना प्रश्न कितीही साधा असला तरी. तो समजून घेत तो सोडवावा. कारण बऱ्याच वेळा प्रश्न साधा जरी वाटत असला तरी तो मन विचलित करणारा असतो. त्यामुळे आधी सांगितल्याप्रमाणे शासनाच्या अधिकृत संदर्भ साहित्य म्हणजे Economic Survey, NCERT Books, योजना, कुरुक्षेत्र मासिके, गॅझेटचा वापर करणे, भूगोल विषयासाठी नकाशे, डायग्रामचा सराव करणे आवश्यक आहे. प्रत्येक विषयाचे वाचन करताना नोटस काढल्याने अंतिम परीक्षेपूर्वी सरावासाठी अत्यंत उपयुक्त असे ते संदर्भ साहित्य असते.

३) मुलाखत : मुलाखतीला जाताना विद्यार्थ्यांनी आपला पेहराव व्यवस्थित नीटनेटका ठेवावा. मुलाखत घेणाऱ्या पॅनलशी संवाद साधताना कोणताही न्यूनगंड न ठेवता स्पष्ट आणि समोरच्याला ऐकू जाईल, अशा विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देणे. साधारणतः १७-१८ प्रश्नांत काही प्रश्नांची उत्तरे नाही आली तरी चालतात, पण उगीच खोटी किंवा थातुरमातुर उत्तरे देऊ नये. कारण तुम्ही बोलताना पॅनलचे इतर सदस्य हे तुमचे हावभाव, देहबोली तपासात असतात. त्यावरून तुमच्या आत्मविश्वासाचा त्यांना अंदाज येतो.

फोटो : भाग्यश्री नवटके

Web Title: A single ray of radiance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.