सिंहगड घाट रस्ता आजपासून तीन महिने दुरुस्तीसाठी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 15:01 IST2018-12-11T15:00:17+5:302018-12-11T15:01:37+5:30
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने या कामांची सुरूवात करण्यात आल्यामुळे आता पर्यटकांचा प्रवास सुखकर होणार आहे.

सिंहगड घाट रस्ता आजपासून तीन महिने दुरुस्तीसाठी बंद
ठळक मुद्देपाच कोटीचा निधी मंजूर होवूनही वर्षांपासून रस्ता दुरुस्तीचे काम होते रखडले
पुणे : काँक्रिटीकरण आणि डांबरीकरणाचे काम सुरू करण्यात आल्याने सिंहगड घाट रस्ता आजपासून तीन महिने बंद ठेवण्यात येणार आहे. पाच कोटीचा निधी मंजूर होवूनही वर्षांपासून रस्ता दुरुस्तीचे काम रखडले होते. लोकमतने या कामाचा वेळोवेळी पाठपुरावा देखील केला होता. आता पर्यटकांचा प्रवास सुखकर होणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने या कामांची सुरूवात करण्यात आली असून वन विभाग आणि वनसंरक्षण समितीचे वतीने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार रस्ता तीन महिने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.