सिंहगड रस्ता बनतोय कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:14 AM2021-02-26T04:14:32+5:302021-02-26T04:14:32+5:30

पुणे महानगरपालिकेने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून आरटीपीसीआर टेस्टच्या माध्यमातून कोरोनाग्रस्तांची चाचणी करण्यास सुरुवात केली. गेले सात महिने ...

Sinhagad road becoming Corona's 'hotspot' | सिंहगड रस्ता बनतोय कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’

सिंहगड रस्ता बनतोय कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’

Next

पुणे महानगरपालिकेने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून आरटीपीसीआर टेस्टच्या माध्यमातून कोरोनाग्रस्तांची चाचणी करण्यास सुरुवात केली. गेले सात महिने विविध टेस्टिंगच्या माध्यमातून ज्यामध्ये आरटीपीसीआर टेस्ट आणि रॅपिड अँटिजेन टेस्ट या माध्यमातून शहरातील नागरिकांच्या कोरोनाच्या चाचण्या करण्याचा प्रयत्न महानगरपालिका करत आहे. मागील काही दिवसांमध्ये सिंहगड रस्ता परिसरात वाढणारा कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढतच आहे.

सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत जनता वसाहत, धायरी, वडगाव बुद्रुक, वडगाव खुर्द, आनंदनगर, माणिकबाग, हिंगणे, दत्तवाडी, पानमळा वसाहत, राजीव गांधी वसाहत, दांडेकर पूल, गणेशमळा आदी परिसर येत असून धायरी व वडगाव परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या आढळत आहे. सध्या सिंहगड रस्ता परिसरात लायगुडे रुग्णालय, पु. ल. देशपांडे उद्यान अशा दोन ठिकाणी चाचण्या केल्या जातात.

चौकट : धायरी आणि वडगावमध्ये सर्वाधिक रुग्ण

सिंहगड रस्त्यावरील धायरी व वडगाव भागात कोरोनाचे रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. सध्या धायरीमध्ये ११० तर वडगाव, आनंदनगर व माणिकबागमध्ये १३२ रुग्ण ॲक्टिव्ह आहेत.

कोट:

सर्वांनी सामाजिक अंतर, मास्क आणि स्वच्छता या तीन गोष्टी पाळल्या तर कोरोना विषाणूचा संसर्ग कमी होईल. - जयश्री काटकर, सहायक आयुक्त

सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालय

धायरी भागात वाढती कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेता सरकारने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन केल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे शक्य आहे. - महेश पोकळे, विभागप्रमुख

शिवसेना खडकवासला

Web Title: Sinhagad road becoming Corona's 'hotspot'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.