सिंहगड रस्ता जळीतकांडाची सर्वसामान्यांनाच धग

By admin | Published: June 29, 2015 06:57 AM2015-06-29T06:57:40+5:302015-06-29T06:57:40+5:30

एरवी शांत असलेला सिंहगड रस्ता परिसर आता खून, मारामाऱ्या, चोऱ्या, बलात्कार, साखळी चोऱ्यांच्या घटनांमुळे प्रकाशझोतात आला आहे.

Sinhagarh road is not only visible to the people of Savarkar | सिंहगड रस्ता जळीतकांडाची सर्वसामान्यांनाच धग

सिंहगड रस्ता जळीतकांडाची सर्वसामान्यांनाच धग

Next

पुणे / सिंहगड रस्ता : एरवी शांत असलेला सिंहगड रस्ता परिसर आता खून, मारामाऱ्या, चोऱ्या, बलात्कार, साखळी चोऱ्यांच्या घटनांमुळे प्रकाशझोतात आला आहे. अशी भयावह परिस्थिती निर्माण झाली असताना रविवारी पहाटे सनसिटी रस्ता परिसरातील काही सोसायट्यांमधील दुचाकी जाळण्याचा प्रकार घडला. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.
सिंहगड रस्ता, दत्तवाडी व ग्रामीण पोलिसांच्या हवेली पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्रात येत असून, भुरट्या चोऱ्या, खून व खंडण्यांच्या प्रकारामुळे परिसराची परिस्थिती पूर्वीपेक्षा बदलली आहे. सहा आसनी, तीन आसनी पॅगो वाहतुकीच्या व्यवसायातून अनेक पुढारी नेतृत्वासाठी आसुसले आहेत.
राजकारणी व बांधकाम व्यावसायिकांनी बेरोजगार पोरांना आशेला लावून आपले बस्तान बसविले आहे.
पोलिसांचा दबदबा राहिला नसल्याने टोळीयुद्धातून वर्चस्वासाठी जो तो प्रयत्न करत आहे. सिंहगड रस्ता परिसरही सर्वसामान्यांसाठी असुरक्षित होतो की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. पोलिसांनी वेळीच पावले उचलून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या नाहीत, तर पोलिसांना सर्वसामान्य जनता आरोपांच्या पिंजऱ्यात उभी केल्याशिवाय राहणार नाही.
अक्षय ग्लोरीतील घटनेबाबत रहिवासी राहुल कामठे यांनी सांगितले, की
मध्यरात्री सोसायटीत काहीसा आवाज जाणवला. मात्र, शेजारील इमारतीतून कशाचा तरी आवाज झाला असावा, असे वाटल्याने आपण थोडे दुर्लक्ष केले. घटनेची माहिती मिळताच आमदार भीमराव तापकीर, श्याम देशपांडे, सचिन तावरे, अभय छाजेड, राजाभाऊ लायगुडे, युगंधरा चाकणकर आदींनी घटनास्थळी धाव घेतली होती. हरिदास चरवड यांनी कार्यकर्त्यांसह पोलीस ठाण्यात निवेदन देऊन अधिकाऱ्यांना
धारेवर धरले.

कशी लावली आग?
सलग सुट्या असल्याने पहाटेच्या वेळी वर्दळ नव्हती. तीनच्या सुमारास डॉमिनोज पिझ्झाजवळ घुटमळणाऱ्या तरुणाने तेथे पार्क केलेल्या दुचाकींपैकी एकीचे पेट्रोलचे पाईप तोडून काडीने दुचाकी पेटवून दिली.

सर्वांत मोठी घटना
गॅँगवॉर, खुन्नस, वादविवाद यातून आजपर्यंत भारती विद्यापीठ, दत्तवाडी, कोथरूड, पिंपरी, येरवडा, हडपसर या भागांमध्ये गाड्यांची तोडफोड करणे किंवा पेटवण्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये २० ते २५ गाड्यांचे नुकसान झाले आहे. मात्र, आज घडलेल्या घटनेमध्ये माथेफिरूने तब्बल ९२ गाड्या पेटवून दिल्या आहेत. तसेच, दुकाने आणि इमारतींचेही नुकसान झाले आहे.


सिंहगड रोड, सनसिटी रोड आणि नऱ्हे परिसरात घडलेल्या घटनेचा सखोल तपास सुरू केला आहे. यासाठी विशेष तपास पथके तयार केली असून, घटनास्थळावरून मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजवरून काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले. ही घटना कोणी माथेफिरूने केली की कोणत्या वादातून झाली? याबाबतची माहिती सखोल तपास केल्यावरच समोर येईल.
- के. के. पाठक, पोलीस आयुक्त

हार्ड डिस्क पोलिसांकडे
अवधूत आर्केडमधील डॉ. सुनील धनवडे म्हणाले, की आमच्या सोसायटीत सीसीटीव्ही आहे, त्यालाही आगीची झळ पोचली आहे. पोलिसांना सीसीटीव्ही कॅमेऱ्याची हार्ड डिस्क दिली आहे. स्वामी नारायण सोसायटीतील वासंती रावेतकर म्हणाल्या, की धूर नाका-तोंडात गेल्याने खूप त्रास होत होता.

Web Title: Sinhagarh road is not only visible to the people of Savarkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.