Video: 'साहेब नुकतीच गाडी लावली होती',... पुण्यात पोलिसांनी सामानासहितच उचलली दुचाकी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 05:43 PM2022-03-14T17:43:32+5:302022-03-14T17:44:47+5:30
महिलेने विनंती करूनही वाहतूक पोलिसच ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसत आहे
पुणे : पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावर पोलीस कारवाई दरम्यान एक दुचाकी सामानासहित गाडी उचलल्याचे समोर आले आहे. महिलेने विनंती करूनही वाहतूक पोलिसच ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे व्हिडिओत दिसत आहे. सोशल मीडियावर हा गाडी उचलल्याचा व्हिडिओ जोरदार धुमाकूळ घालत आहे.
पुण्यातील नाना पेठेत काही महिन्यांपूर्वी वाहतूक पोलिसांनी कारवाई दरम्यान क्रेनच्या सहाय्याने दुचाकी ही चालकासहित उचलण्यात आली होती. तरुणाने अशीच दोन मिनिटासाठी गाडी लावली होती. असे तो त्यावेळी सांगत असतानाही पोलिसांनी विलंब न करता तातडीने गाडी उचलली होती. तसाच प्रकार लक्ष्मी रस्त्यावर घडलेला आहे. या घटनेचा फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.
पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावर सोमवारी सकाळी ११ वाजता दोघे जण खरेदीसाठी दुचाकीवरून आले होते. यावेळी पार्किंगच्या बाहेर दुचाकी लावून ते खरेदीसाठी गेले होते. तेवढ्यात वाहतूक पोलिसांची गाडी नो पार्किंग किंवा पार्किंगच्या पांढर्या पट्टीबाहेर लावलेल्या गाड्यांवर कारवाई करण्यासाठी आली. यावेळी दुचाकीमध्ये खरेदी केलेले साहित्य ठेवण्यात आलं होतं. पोलिसांनी त्या साहित्यासह क्रेनच्या मदतीने दुचाकी उचलली.
पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावर पोलिसांनी सामानासहित उचलली दुचाकी #Pune#Policepic.twitter.com/Ew1uSnyb0x
— Lokmat (@lokmat) March 14, 2022
साहेब नुकतीच गाडी लावली होती...
पोलीस गाडी उचलताना दिसताच दोघे धावत आले. आणि त्यांनी पोलिसांना विनंती करण्यास सुरुवात केली. ‘साहेब नुकतीच गाडी लावली होती. आमच्या साहित्याचं नुकसान होईल. आमची गाडी सोडा’ अशी विनंती केली. पण काही केल्या वाहतूक ;पोलिसांनी ऐकले नाही. या कारवाईचे रेकॉर्डिंग होत असल्याचं लक्षात येताच क्षणाचाही विलंब न लावता पोलिसांनी गाडी सोडून दिली.