‘सर’ ठरतोय शिरजोर
By admin | Published: November 8, 2016 01:26 AM2016-11-08T01:26:23+5:302016-11-08T01:26:23+5:30
औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांमधून भंगार माल ते यंत्राचे सुटे भाग चोरण्याची साखळी यंत्रणा मॅनेज करून माया जमविलेल्या ‘सर’ नामक भामट्याची चाकण, तळेगाव औद्योगिक पट्ट्यात दहशत आहे
राम नेवले यांची माहिती : आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन
गडचिरोली : विदर्भ स्वतंत्र राज्य झाल्यास हे राज्य महाराष्ट्रापेक्षाही प्रगत व सक्षम राज्य राहिल. विदर्भातील नोकऱ्या येथील युवकांनाच मिळणार असल्याने येथील बेकारीही कमी होण्यास फार मोठी मदत होईल. त्यामुळे युवकांनीही विदर्भ राज्याच्या आंदोलनात सहभाग नोंदवावा, असे आवाहन विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य निमंत्रक रामभाऊ नेवले यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेतून केले आहे.
विदर्भ राज्यासाठी ५ डिसेंबर रोजी नागपूर विधानभवनावर भव्य मोर्चा काढला जाणार आहे. विदर्भातून वेगवेगळ्या ठिकाणातून पाच दिंड्या नागपूर येथे एकत्र येणार आहेत. गडचिरोली जिल्ह्यातून कालेश्वर येथून विदर्भ दिंडी निघणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेदरम्यान राम नेवले यांनी दिली. पत्रकार परिषदेला अरूण मुनघाटे, रंजना मामर्डे, प्रभाकर वासेकर, पांडुरंग घोटेकर, समया पसुला, बर्लावार उपस्थित होते.