‘साहेब, आता एकदा तरी गावाकडं बघाच!'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:11 AM2021-05-11T04:11:15+5:302021-05-11T04:11:15+5:30

उंडवडी कडेपठार : बारामती तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहरात कोरोना उपायांसह निर्बंध तोडणाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई ...

‘Sir, look at the village at least once! ' | ‘साहेब, आता एकदा तरी गावाकडं बघाच!'

‘साहेब, आता एकदा तरी गावाकडं बघाच!'

Next

उंडवडी कडेपठार : बारामती तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहरात कोरोना उपायांसह निर्बंध तोडणाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई केली जात आहे. तरी ग्रामीण भागात मात्र कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात काही उदासीन कोरोनाबाधित कोरोना नियमांची पायमल्ली करीत आहेत. त्यामुळे ‘साहेब, आता एकदा तरी गावाकडं बघाच!’असे साकडे गोजुबावी ग्रामपंचायतीने पोलिसांना घातले असून ग्रामपंचायतीने पोलिसांना पत्रव्यवहार करून तशी विनंती केली आहे.

आज सोमवार दि. १० रोजी अँटिजन टेस्ट कॅम्प आयोजित केला होता. त्यामध्ये ३६ रुग्ण पाॅझिटिव्ह सापडले असून, त्यांना माळेगाव कोविड सेंटरमध्ये क्वारंटाइन करण्यास नेण्यात आले आहे. गोजुबावी ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोना विषाणूला रोखण्यासाठी पॉझिटिव्ह रुग्णाच्या घराच्या परिसरात सोडियम हायपो-क्लोराइडने नियमित क्लोरिनेशन सुरु आहे. औषधफवारणी तसेच संपूर्ण गावातसुद्धा औषध फवारणी वेळोवेळी करत आहे. अँटिजन टेस्ट कॅम्प घेऊन लोकांची तपासणीसुद्धा करण्यात आली आहे. आरोग्य विभागाच्या मदतीने पॉझिटिव्ह रुग्णांच्या घरी भेटी देऊन त्यांना औषध पुरवठा नियमित करुन देत आहे. ग्रामपंचायतकडून कोरोनाला रोखण्यासाठी ज्या ज्या उपाययोजना करता येतील त्या उपाययोजना केल्या जात आहेत. परंतु काही नागरिक जे पॉझिटिव आहेत ते इतर लोकांचा विचार न करता विना मास्क गाव कट्ट्यावर बसत आहेत. विनाकारण गावात फिरत आहेत. त्यांच्यामुळे इतर ग्रामस्थांना कोरोनाची लागत होऊन रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या ग्रामस्थांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासनाचे सहकार्य मिळावे म्हणून ग्रामपंचायतीने पोलीस प्रशासनाला अनेकदा पत्रव्यवहार केलेला आहे. पोलिस प्रशासनाचे सहकार्य मिळाल्यास जे विनाकारण विणा मास्क फिरत आहेत त्यांच्यावर कारवाई करणे सोपे जाईल. त्याचबरोबर लसीकरण केंद्रासाठी गेली दीड महिन्यापासून पाठपुरावा करुन देखील अजुून गोजुबावी गावात लसीकरण केंद्र चालू केले नाही. गोजुबावी गावातील वाढत असलेली रूग्णांची संख्या रोखण्यासाठी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासने लवकरात लवकर सहकार्य करावे. गोजुबावी गावामध्ये लवकरात लवकर लसीकरण केंद्र सुरू करण्यात यावे. अशी मागणी सरपंच माधुरी कदम,उपसरपंच दुर्गादास भोसले,ग्रामसेवक सतीश बोरावके,ग्रा.पंचायत सदस्य किशोर जाधव,पोलीस पाटील नितीन गटकळ तसे सर्वे करणारे सर्व शिक्षक,आरोग्य कर्मचारी यांनी मागणी केली.

——————————————

चोकट ——

ग्रामपंचायत गोजुबावी मधील रूग्णांची आकडेवारी

आज अखेर एकुण रूग्ण - १९१

अ‍ॅक्टीव रूग्ण - ८०

दवाखान्यात - २९

माळेगाव कोव्हिड सेंटरला काॅरन्टाईन - ३६

घरी ‘कॉरन्टाईन’ - १५

बरे झालेले रूग्ण - १०७

आज अखेर मूत्यू रूग्ण - ०४

——————————————

Attachments area

Web Title: ‘Sir, look at the village at least once! '

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.