साहेब, फार्म ऑनलाईन भरायला रात्रीचा येऊ का हो ...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:14 AM2020-12-30T04:14:58+5:302020-12-30T04:14:58+5:30

ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा रणसंग्राम सुरू झाला आहे थंडी पडू लागली आहे थंडीत निवडणुकीचे गरम वारे वाहत आहेत उमेदवारास जोश आलेला ...

Sir, why come at night to fill the form online ...! | साहेब, फार्म ऑनलाईन भरायला रात्रीचा येऊ का हो ...!

साहेब, फार्म ऑनलाईन भरायला रात्रीचा येऊ का हो ...!

Next

ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा रणसंग्राम सुरू झाला आहे थंडी पडू लागली आहे थंडीत निवडणुकीचे गरम वारे वाहत आहेत उमेदवारास जोश आलेला आहे. याचा प्रत्यय येत आहे निवडणूक अर्ज ऑनलाईन दाखल करण्यासाठी सगळेच त्या साइटवर बसून आहेत त्यामुळेच दिवसाला किसाईट संथ गतीने चालत असते अशी ओरड आहे दिवसभर नेट कॅफे मध्ये एका जागी बसून गाव पुढारी कंटाळलेले असतात साहेब रात्री नेट व साईट जोरात चालते काय असे मनस्ताप करून नेट कॅफेच्या मालकांना विचारतात तेही त्यांच्या बोलण्याला हो देत या ना रात्री असे बोलून आपले दिवसा ने त्याची कामे करतात.

गाव खेड्यात असणारे गाव पुढारी सामान्यतः शेतकरी असतात तेही आपली शेतातली व घरची कामे उरकून सवडीने तालुक्याला येतात आपल्या सवंगड्यांना सोबत घेऊन येतात इथे मग छोटी पार्टीही केली जाते रात्री उमेदवारी अर्ज भरण्यास निवांतपणा मिळतो कारण बहुदा रात्रीला जाम असलेली ही साईट मोकळी होते त्यामुळे पटापट अर्ज दाखल करण्यास मदत होते.

पॅनलचे अधिक उमेदवार असल्याने वेळ लागतो त्यामुळे स्थानिक पुढारी थंडीत रात्री जागरण करून उमेदवारी दाखल करीत आहेत ऑनलाईन अर्ज दाखल करणे ही उमेदवाराची कसोटीस बघणे आहे. कधी साईट संत गती नेटवरचा खोडा तसेच कागदपत्रांची जमवाजमव आधी भानगडी वर विजय मिळवून अर्ज भरण्याची प्रक्रिया केली जात आहे अर्ज दाखल करण्यासाठी बँकेचे नवीन खाते उघडणे बँकेची पास पुस्तक घेणे ही नवीनच उमेदवारांना लागली आहे.

मेदवारी दाखल करण्यास उमेदवारांना विविध दाखल्यासाठी गरगर फिरावे लागते उमेदवारी अर्ज दाखल झाल्यापासून ते नामनिर्देशन पत्र कायम राहण्यापर्यंत ताण सहन करावा लागतो त्या नंतरचे दिवस त्यांच्या परीक्षेचा काळ राहतो प्रत्येक उमेदवार त्या परीक्षेत पास निवडून येण्यासाठी विविध आयुधांचा वापर करीत असतो त्यानंतर प्रतिक्षा होत असते गुलाल उधळण करण्याची.

Web Title: Sir, why come at night to fill the form online ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.