साहब... स्कूल कै से जाएंगे?

By admin | Published: July 9, 2015 02:12 AM2015-07-09T02:12:43+5:302015-07-09T02:12:43+5:30

वेळ सकाळी आठची... बारामतीकरांचे दैनंदिन जीवन नेहमीप्रमाणे सुरू होते.. त्यातच इंदापूर चौकात दोन बांबूंवर बांधलेल्या दोरीवरील एका बालिकेच्या कसरती सर्वांचेच लक्ष वेधून घेत होत्या

Sir ... will you go to school? | साहब... स्कूल कै से जाएंगे?

साहब... स्कूल कै से जाएंगे?

Next

बारामती : वेळ सकाळी आठची... बारामतीकरांचे दैनंदिन जीवन नेहमीप्रमाणे सुरू होते.. त्यातच इंदापूर चौकात दोन बांबूंवर बांधलेल्या दोरीवरील एका बालिकेच्या कसरती सर्वांचेच लक्ष वेधून घेत होत्या... ते पाहून काही बारामतीकरांची पाऊलेदेखील या ठिकाणी थबकली... अजाणत्या वयात शाळा सोडून या मुलीला जीवघेण्या कसरती कशाला करायला सांगतो, असा सवाल या वेळी डोंबारी युवकाला नागरिकांनी विचारला. त्यावर ‘पेट का सवाल है, साहब... स्कूल कै से जाएंगे, काम तो करना पडता है’ या मिळालेल्या उत्तराने बारामतीकर निरुत्तर होऊन मार्गस्थ झाले.
शहरात एकीकडे शालाबाह्य बालकांची सर्वेक्षण मोहीम राबविण्यात आली आहे. मात्र, डोंबारी खेळ करून कसरत करणारी, लहान वयातच अंग मेहनतीचे जीवघेणे खेळ करून अर्थार्जन करणारी ही बालिका सर्वेक्षणापासून दूरच आहे. याच दरम्यान अजाणत्या वयात कुटुंब प्रमुखाप्रमाणे कसरती करून अर्थार्जन करणारी बालिका बारामती शहरात चर्चेचा विषय बनली होती. सोशल मीडिया, डिजिटल युगात सर्वच खेळ, कलांपासून प्रेक्षक दुरावला आहे. डोंबाऱ्याचा खेळ असाच कसरतीचा. या खेळाला ग्रामीण भागातील आठवडे बाजार, यात्रांमधून मोठा प्रेक्षक वर्ग लाभला होता.
अनेक दिवसांपासून हा खेळ दुर्मिळ होण्याच्या मार्गावर आहे. मात्र, बुधवारी (दि. ८) छत्तीसगड येथील परराज्यातील डोंबारी कुटुंबाने भल्या सकाळीच येथे त्यांचा खेळ सुरू केला.
दोन्ही बाजूने बांबूला बांधलेल्या दोरीवर ७ ते ८ फुटांवरून बांबूच्या साह्याने ‘बॅलन्स’ करीत चिमुरडीने कसरती सुरू केल्या. डोक्यावर तांब्या ठेवून चालणे, पायात चप्पल घालून दोरीवरून चालणे, सायकलची रिंग घेऊन चालणे, दोरीवर ठेवलेल्या थाळीत गुडघे टेकवून पुढे सरकणे आदी कसरती पाहून बारामतीकर शहारले. एका बारामतीकराने मुलीचे वय काय, ती शाळेत जात नाही का, असे त्या व्यावसायिकाला विचारले. त्यावर ‘वह स्कूल जाती है, साहब. पेट के लिए काम करना पडता है... स्कूलसे छुट्टी लेकर आए है’ असे सांगितले. त्यावर तो बारामतीकर नागरिक निरूत्तर झाला. त्यानंतर पुन्हा ‘बॅलन्स’ का कमाल, बॅलन्स का खेल, अशी आरोळी देत पुन्हा त्यांचा खेळ सुरू झाला.
(प्रतिनिधी)

> शहरात एकीकडे शालाबाह्य बालकांची सर्वेक्षण मोहीम राबविण्यात आली आहे. मात्र, डोंबारी खेळ करून कसरत करणारी, लहान वयातच अंगमेहनतीचे जीवघेणे खेळ करून अर्थार्जन करणारी ही बालिका सर्वेक्षणापासून दूरच आहे

Web Title: Sir ... will you go to school?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.