आंबेगाव तालुक्यात घोड नगीत बुडून बहीणभावाचा करुण अंत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2019 09:53 PM2019-06-15T21:53:07+5:302019-06-15T21:54:01+5:30
घोड नदीपात्रात कपडे धुण्यासाठी गेलेल्या बहीणभावाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.
मंचर : वडगाव काशिंंबेग (ता. आंबेगाव) येथील घोड नदीपात्रात कपडे धुण्यासाठी गेलेल्या बहीणभावाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी १२ वाजता घडली. काजल विजय पवार (वय १५) व प्रेम विजय पवार (वय १०, दोघेही मूळ रा. विश्रांतवाडी, सध्या वडगाव) अशी पाण्यात बुडून मरण पावलेल्या बहीणभावांची नावे आहेत. सुदैवाने काठावरील दोन भावंडे पाण्यात उतरली नसल्याने बालंबाल बचावली.
विश्रांतवाडी (पुणे) येथे राहणारे विजय साहेबराव पवार वडगाव काशिंबेग येथे तात्पुरत्या वास्तव्यासाठी आले होते. घिसाडीकाम करून विळे, खुरपे व इतर शेती उपयोगी साहित्य तयार करून त्याची विक्री पवार करतात. सकाळी विजय पवार पत्नी सुरेखा हिला घेऊन चाकण येथील बाजारात विळे व खुरपे विकण्यासाठी गेले होते. त्यांची ४ मुले दिव्या विजय पवार, क्रिश विजय पवार, काजल विजय पवार, प्रेम विजय पवार, आजी कलाबाई भीमराव चव्हाण व मतिमंद चुलतभाऊ सुनील साहेबराव पवार सकाळी साडेअकरा वाजता कपडे धुण्यासाठी घोड नदीवर गेले. वडगाव काशिंबेग येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाºयाच्या खालील बाजूस ढुमा डोह येथे कपडे धूत असताना गोधडी पिळण्यासाठी एका बाजूला सुनील पवार व दुसºया बाजूला काजल व प्रेम ही दोन मुले पाण्यात उतरली. त्यावेळी पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने खोलवर पाण्यात पुढे जात काजल पवार व प्रेम बहीण-भाऊ पाण्यात बुडू लागले. बुडत असताना दोघेही हात वर करून वाचविण्यासाठी आवाज देत होते. त्यावेळी दिव्या पवारने सुनील पवार यास बुडणाºया बहीण-भावाला बाहेर काढण्यास सांगितले. मात्र मतिमंद सुनीलला काहीच सुचले नाही. दोन्ही मुले पाण्यात बुडत असताना घोड नदीकाठावर कोणीच नव्हते. दिव्या हिने धावत वडगाव गावात जाऊन ग्रामस्थांना घडलेल्या घटनेची कल्पना दिली. ग्रामस्थ मदतीसाठी नदीकाठावर पोहोचेपर्यंत अर्धा तास झाला होता. दत्ता तारू, एकनाथ तारू या दोन तरुणांनी पाण्यात बुड्या मारून बुडालेल्या बहीण-भावांना बाहेर काढले. दोघा बहीण-भावांंचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांना घटनेची