'दीदी दरवाजा उघडत नाहीये', बहिणीची हाक, युवतीने उचलले होते टोकाचे पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 18:35 IST2025-03-26T18:35:21+5:302025-03-26T18:35:59+5:30
वडिलांनी दरवाजा तोडल्यावर युवतीने स्वतःला संपवल्याचे दिसून आले

'दीदी दरवाजा उघडत नाहीये', बहिणीची हाक, युवतीने उचलले होते टोकाचे पाऊल
शिरूर : शिरूर येथे राहत्या घरी १८ वर्षाच्या युवतीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना काल उघडकीस आली. अंजली गजानन टिपरे ( १८, सध्या रा.-पोद्दार शाळेजवळ, रामलिंग रोड, ता.शिरूर मुळ रा.. बान्सी, ता. पुसद, जि . यवतमाळ) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. यासंदर्भात पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार राजू रामदास टिपरे यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली होती.
सोमवारी पहाटे ३ वाजता राजू टिपरे हे वीटभट्टी येथे कामास गेले होते. त्यावेळी पुतणी अंजली गजानन टिपरे वय १८ वर्षे ही देखील त्याच्या सोबत गेली होती. त्यानंतर सकाळी पावणेदहाचा सुमारास तीने कामाच्या ठिकाणी चहा करून आणुन दिला व घरी निघुन गेली. सकाळी साडे दहाच्या सुमारास राजू यांची मुलगी उषा वय ९ वर्षे ही रडत रडत वीटभट्टी वरती आली. तिने सांगितले की “दिदी ने घराचा दरवाजा बंद केला असून ती घराचा दरवाजा उघडत नाही. त्यावेळी राजू व त्यांची पत्नी शितल यांनी घरी जावुन पाहीले तर घरचा दरवाजा बंद होता. त्यावेळी अंजलीला दरवाजा उघडण्यासाठी आवाज दिला असता तीने आतून प्रतिसाद दिला नाही. अखेर राजू यांनी दरवाजा जोरात ढकलून उघडला. तर घरामध्ये वरती असणा-या लाकडाला ओढणीचे सहाय्याने अंजली हीने गळफास घेतल्याचे दिसून आले. दरम्यान, तीला रुग्णवाहिकेमधून उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय शिरूर येथे नेले. तेथील डॉक्टरांनी तपासून उपचारापुर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले. याबाबतचा आधिक तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली राउत हे करीत आहेत.