सिताफळांचा हंगाम सुरू; चांगला भाव मिळत असल्याने बळीराजा समाधानी
By अजित घस्ते | Published: July 17, 2023 03:00 PM2023-07-17T15:00:15+5:302023-07-17T15:00:37+5:30
हंगाम सुरु झाल्यावर सुरुवातीला ४ ते ५ टन आवक सुरू असून ऑगस्ट मध्ये ४० ते ५० टन आवक वाढते
पुणे :सध्या मार्केटयार्ड बाजारात सिताफळाचा आवक सूरू असून यंदा सीताफळाला किलोला प्रतवारी नूसार २० ते १८० भाव मिळत आहे. जिल्हातून वडकी,पुरंदर, शिरूर, नगर , इंदापूर,सासवड याभागात आवक सूरू असून मार्केटयार्ड बाजारात दिवसाला ४ ते ५ टन आवक होत आहे. अधिक मासात सिताफळाला अधिक मागणी असते. चालू हंगामात सिताफळाला दर चांगला मिळत असल्याने शेतकरी ही समाधान असल्याचे शेतक-यांनी सांगितले.
सिताफळाचा हंगाम जुलै ते नोव्हेबर पर्यंत असतो. सुरुवातीला ४ ते ५ टन आवक सुरू असून ऑगस्ट मध्ये ४० ते ५० टन आवक वाढते. यावर्षी पावसामुळे सिताफळांचे उत्पादन कमी असले तरी शेतक-यांना चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकरी ही समाधान असल्याचे फळ व्यापारी माऊली आंबेकर यांनी सांगितले.
''शिरूर येथे ५ एकरमध्ये सिताफळांची लागवड केली आहे. पावसामुळे यंदा उत्पादन कमी झाले असले तरी मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी प्रतवारी नुसार समाधान कारक भाव मिळत आहे. -राजेंद्र जगताप शेतकरी''