हडपसर, काळेपडळ पोलीस ठाण्यांसाठी जागेची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:10 AM2021-01-14T04:10:55+5:302021-01-14T04:10:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : हडपसर परिसरात काळे पडळ आणि फुरसुंगी या दोन नवीन पोलीस ठाण्यांच्या निर्मितीला नुकतीच परवानगी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : हडपसर परिसरात काळे पडळ आणि फुरसुंगी या दोन नवीन पोलीस ठाण्यांच्या निर्मितीला नुकतीच परवानगी दिल्यानंतर आता जागेची पाहणी सुरु केली आहे. मोहम्मदवाडी येथे काळेपडळ पोलीस ठाण्यासाठी तर हडपसर येथील विठ्ठलराव तुपे नाट्यगृहाशेजारील जागेत पोलिसांच्या इमारतीसाठीच्या जागेची पहाणी केली. यावेळी आमदार चेतन तुपे, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते, हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस बाळकृष्ण कदम, वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक क्रांतीकुमार पाटील विघ्नहर्ता न्यास समन्वयक डॉ. शंतनु जगदाळे उपस्थित होते.
पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी सांगितले की, हडपसर येथील नाट्यगृहाशेजारी तत्कालीन शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष चेतन तुपे यांच्या प्रयत्नातून पोलिसांसाठी २०१४ मध्ये ३० गुंठे जागा देण्यात आली. या ठिकाणी हडपसर पोलीस ठाणे तसेच पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त आणि गुन्हे शाखेच्या युनिट ५ चे कार्यालय असे एकत्रित इमारत उभारणार आहे. महंमदवाडी येथील पोलीस चौकीच्या परिसरात १५ गुंठे जागा आहे. त्या ठिकाणी काळे पडळ पोलीस ठाणे करण्याचा प्रयत्न आहे. यासाठी दोन्ही ठिकाणी आम्ही भेटी देऊन पाहणी केली.
याबाबत आमदार चेतन तुपे यांनी सांगितले की, हडपसर येथील विठ्ठल तुपे नाट्यगृहाशेजारील जागेवर पोलिसांसाठी एक भव्य वास्तू निर्मितीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याचप्रमाणे मुंढवा पोलीस ठाणेची नवीन इमारत बांधायचे काम सुद्धा सुरु करत आहे. तसेच फुरसुंगी येथे व मोहम्मदवाडी येथील तरवडे वस्तून नवीन पोलीस ठाण्याची इमारत निर्मिती करणार आहे. त्यासाठी जागेची पाहणी केली.
फोटो : हडपसर परिसरात काळे पडळ आणि फुरसुंगी या दोन नवीन पोलीस ठाण्यांच्या निर्मितीला परवानगी दिल्यानंतर जागेची पाहणी करताना पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, आमदार चेतन तुपे, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील व इतर मान्यवर.