माहिती तंत्रज्ञान कंपनीतील डाटा चोरीप्रकरणी सहा जणांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:11 AM2021-05-23T04:11:25+5:302021-05-23T04:11:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मगरपट्टा सिटीतील एका माहिती तंत्रज्ञान कंपनीतील गोपनीय माहिती (डाटा) चोरून स्पर्धक कंपनीला पुरवून नुकसान ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मगरपट्टा सिटीतील एका माहिती तंत्रज्ञान कंपनीतील गोपनीय माहिती (डाटा) चोरून स्पर्धक कंपनीला पुरवून नुकसान केल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी ६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत माहिती तंत्रज्ञान कंपनीचे संचालक अनिल बाळकृष्ण वाणी (वय ६८, रा. मुंबई) यांनी सायबर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. तक्रारदार यांची मगरपट्टा सिटीत माहिती-तंत्रज्ञान कंपनी आहे. त्यांच्या कंपनीतील दोन महिला तसेच एका कर्मचार्यांनी कंपनीतील गोपनीय व संवेदनशील माहिती चोरली. चोरलेली माहिती त्यांनी स्पर्धक कंपनीला पुरविली. महिला तसेच एका कर्मचार्याने माहिती-तंत्रज्ञान कंपनीचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी माहिती-तंत्रज्ञान कंपनी स्थापन केली. आरोपींनी संगनमत करून माहिती चोरीचे कृत्य केले. माझ्या कंपनीला नुकसान व्हावे, या हेतूने त्यांनी कट रचला, असे वाणी यांनी फिर्यादीत म्हटले आहे. सायबर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक मच्छिंद्र पंडित अधिक तपास करीत आहेत.