तमाशा मंडळांना जोधेवाडी ग्रामस्थांकडून सहा पोते धान्याची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:10 AM2021-05-08T04:10:32+5:302021-05-08T04:10:32+5:30
कोरोनामुळे तमाशा मंडळावर उपासमारीची वेळ आली आहे याचा विचार करुन भोर तालुक्यातील वीसगाव खोऱ्यातील जेधेवाडी ग्रामस्थांनी यात्रा वर्गणीतून ३० ...
कोरोनामुळे तमाशा मंडळावर उपासमारीची वेळ आली आहे
याचा विचार करुन भोर तालुक्यातील वीसगाव खोऱ्यातील जेधेवाडी ग्रामस्थांनी यात्रा वर्गणीतून ३० हजार, तर लोकवर्गणीतून २० हजार आणि ६ पोती धान्य देऊन मदत करुन सामाजिक भान राखले आहे.
वीसगाव खोऱ्यातील जेधेवाडी ही एक लहानशी वाडी आहे. या वाडीत मागील ४० वर्षे भिका-भिमा तमाशा मंडळ यात्रेला येऊन तमाशा करुन शोभा वाढवतात. गावातील ग्रामस्थ तरुण त्यांच्या सुख दु:खात सहभागी होतात. विशेष म्हणजे ग्रामस्थ त्याच्या घरी धुळे नंदुरबारलासुध्दा जाऊन आले आहेत. २ वर्षे कोरोनामुळे अतिशय बिकट परिस्थिती निर्माण झाल्यामुळे यात्रा कमिटी व लोकांची बैठक होऊन त्यामध्ये तमाशा मंडळाला मदत करण्याचा निर्णय घेतला. या वेळी तमाशा मंडळाचे योगेश सांगवीकर, गणेश सांगवीकर, राजेश सांगवीकर हे तमाशा मालक उपस्थित होते.
--
फोटो क्रमांक : ०७ भोर तमाशा मंडळ