जायका प्रकल्पासाठी सहा कंपन्या आल्या पुढे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:16 AM2021-08-25T04:16:22+5:302021-08-25T04:16:22+5:30
पुणे : नदीसुधार कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या जायका प्रकल्पासाठी निविदा भरण्यासाठी सादर केलेल्या मुदतीत सहा कंपन्यांनी निविदा सादर केल्या असून, ...
पुणे : नदीसुधार कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या जायका प्रकल्पासाठी निविदा भरण्यासाठी सादर केलेल्या मुदतीत सहा कंपन्यांनी निविदा सादर केल्या असून, त्यांनी हे काम करण्याची तयारी दर्शविली आहे़
शहरातील मैलापाण्यावर प्रक्रिया करून शुद्ध केलेले पाणी या प्रकल्पांतून नदीत सोडण्यात येणार आहे़ याकरिता वारंवार निविदा भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती़ तसेच केंद्र सरकारच्या अटी व नियमांनुसार तसेच जपान येथील जायका कंपनीच्या सूचनांनुसार निविदांमधील अटी व शर्ती बदलून व आवश्यक ते बदल करून निविदा भरण्यासाठी पुणे महापालिकेने आवाहन केले होते़ सहा वर्षे चाललेल्या या प्रकियेत आज निविदेच्या अंतिम मुदतीनंतर निविदांचे ‘अ’ पाकिट उघडण्यात आले़
यामध्ये सहा कंपन्यांनी तयारी दर्शविली असून, यामध्ये मे. टाटा प्रोजेक्ट्स प्रा. लि व पी अँड सी प्रोजेक्ट्स-कन्सोरशिअम, मे. एनव्हायरो कंट्रोल व तोशिबा वॉटर सोल्यूशन्स-जेव्ही, मे. व्हीए टेक वाबाग व पी. सी.आय.एल-जेव्ही, मे. एल अँड टी व के.आय.पीएल-जेव्ही, मे. जे.एम.सी व मेटीटोव अल्के -जेव्ही व मे. जे. डब्ल्यू.आय. एल व एस.एस.जी व एस. पी.एम.एल- जेव्ही या कंपन्यांचा समावेश आहे़
मुदत आज संपली असता तोपर्यंत वरील सहा कंपन्यांनी निविदा सादर केल्या असल्याची माहिती मलनि:सारण विभागाचे अधिक्षक अभियंता जगदीश खानोरे यांनी दिली़
-------------------