एकाच दिवशी सहा घरफोड्या, ७ लाखांच्या ऐवजासह दोघे जेरबंद, अर्धा किलो चांदीसह लाखांचे दागिने जप्त

By नारायण बडगुजर | Published: October 6, 2023 03:14 PM2023-10-06T15:14:41+5:302023-10-06T15:15:27+5:30

तडीपार केल्यानंतरही गुन्हेगारी कृत्य...

Six house burglaries in one day, two arrested with compensation worth Rs 7 lakhs, jewelery worth lakhs along with half a kilo of silver seized | एकाच दिवशी सहा घरफोड्या, ७ लाखांच्या ऐवजासह दोघे जेरबंद, अर्धा किलो चांदीसह लाखांचे दागिने जप्त

एकाच दिवशी सहा घरफोड्या, ७ लाखांच्या ऐवजासह दोघे जेरबंद, अर्धा किलो चांदीसह लाखांचे दागिने जप्त

googlenewsNext

पिंपरी : घरफोडी करून ओळख लपवून फिरत असलेल्या दोन सराईतांना पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने अटक केली. दोन्ही सराईतांकडून सात लाखांचे दागिने जप्त केले. या कारवाईमुळे पाच गुन्ह्यांची उकल झाली.

राम ऊर्फ रामजाने लक्ष्मण क्षीरसागर (रा. वाघोली (गौर), ता. कळंब, जि. धाराशिव), राहुल ऊर्फ लल्या हिरामण लष्करे (रा. काळाखडक झोपडपट्टी, वाकड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ ऑगस्ट रोजी काटे इस्टेट, चोविसावाडी चऱ्होली दिघी परिसरामध्ये अज्ञात चोरट्यांनी दिवसा एकाचवेळी सहा ठिकाणी घरे फोडून चोरी केल्याची घटना घडली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून दोन आरोपींची ओळख पटवली. त्यानुसार लातूर, उस्मानाबाद, वाघोली, मुंबई, पुणे अशा वेगवेगळ्या शहरांमध्ये आरोपींचा शोध घेतला. राहुल लष्करे आणि राम क्षीरसागर या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी सात लाख रुपये किमतीचे नऊ तोळे ३०० ग्रॅमचे सोन्याचे, तसेच ४५० ग्रॅमचे चांदीचे दागिने, दुचाकी असा सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

सहायक पोलिस आयुक्त सतीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनचे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम, उपनिरीक्षक गणेश माने, पोलिस अंमलदार शिवानंद स्वामी, प्रमोद वेताळ, उषा दळे, जयवंत राऊत, देवा राऊत, आशिष कुडके, अजित सानप, शिवाजी मुंडे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

तडीपार केल्यानंतरही गुन्हेगारी कृत्य

राहुल लष्करे याच्यावर देहूरोड, गोरेगाव, महाड टाउन, रत्नागिरी, चतु:श्रृंगी, वाकड या पोलिस ठाण्यांमध्ये ११ गंभीर गुन्हे दाखल आहेत. राम क्षीरसागर याच्यावर चिंचवड, हिंजवडी, मुंढवा, रत्नागिरी आणि गोरेगाव पोलिस ठाण्यात सहा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. राहुल लष्करे याला पिंपरी -चिंचवड पोलिसांनी मागील दोन वर्षांपूर्वी तडीपार देखील केले होते.

पोलिसांनी पाठलाग करून पकडले

राम क्षीरसागर आणि राहुल लष्करे हे दोघेही निगडी परिसरात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावेळी गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना शिताफीने पकडले. गुन्हे शाखा युनिट दोनच्या या कारवाईमुळे दिघी पोलिस ठाण्यातील दोन, चिंचवड, लोणीकंद आणि शिरवळ पोलिस ठाण्यातील प्रत्येकी एक असे एकूण पाच गुन्हे उघडकीस आले.

Web Title: Six house burglaries in one day, two arrested with compensation worth Rs 7 lakhs, jewelery worth lakhs along with half a kilo of silver seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.