पुरग्रस्तांच्या घरात सहाशे कोटींचा ' गाळ'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2019 07:00 AM2019-09-29T07:00:00+5:302019-09-29T07:00:04+5:30
नाल्यांमधील गाळ ‘प्रामाणिक’पणे काढला गेला असता तर कदाचित पुराची तीब्रता कित्येक पटींनी कमी झाली असती.
लक्ष्मण मोरे-
पुणे : शहरात अंबिल ओढ्यासह विविध ओढ्यांना आलेल्या पुरामध्ये मालमत्ता, वाहनांसह मनुष्यहानीही झाली. पुरग्रस्त भागामध्ये रस्त्यारस्त्यावर आणि घराघरात दोन दोन फुट गाळाचा थर साचलेला आहे. पालिकेने गेल्या तीन वर्षात या ओढ्यांमधील गाळासाठी तब्बल ६०० कोटींपेक्षा अधिक खर्च केला आहे. नाल्यांमधील गाळ ‘प्रामाणिक’पणे काढला गेला असता तर कदाचित पुराची तीब्रता कित्येक पटींनी कमी झाली असती. परंतू, ‘टक्केवारी’ची किंमत सर्वसामान्यांना चुकवावी लागत आहे.
शहरामधून दोन महत्वाचे ओढे वाहतात. आता त्या ओढ्यांचे मोठाले नाले झाले आहेत. त्यामध्ये अंबिल ओढा आणि नागझरी अशा दोन प्रमुख ओढ्यांचा समावेश आहे. या मोठ्या नाल्यांना जोडणारे अगर स्वतंत्रपणाने वाहणारे ५५ ओढे असून त्यांची लांबी ४०० किलोमीटरपर्यंत आहे. शहरात बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे कात्रजचे दोन्ही तलाव मोठ्या प्रमाणात ओसंडून वाहू लागल्याने अंबिल ओढ्यासह वानवडी, नºहे या भागातील नाल्यांना पूर आला. शहरातील बहुतांश नाले बुधवारी रौद्ररुपाने वाहात होते. या पाण्यासोबत मोठ्या प्रमाणावर वाहून आलेला गाळ आसपासच्या झोपडपट्ट्या, सोसायट्या, बंगले आणि रस्त्यांवर आला.
ज्या भागात केवळ पावसाचे पाणी वाहून आले त्या भागातील गाळ सुकला असून ती माती उघडी पडू लागली आहे. परंतू, नाल्यालगतचे रस्ते, वसाहती, सोसायट्यांमध्ये घुसलेल्या पाण्यामुळे काळ्या रंगाचा गाळ उघडा पडू लागला आहे. हा सर्व गाळ नाल्यामधून पाण्यासोबत वर आला. यासोबतच शेकडो टन कचरा, प्लास्टीक, कपडे, विविध स्वरुपाच्या वस्तूही बाहेर आल्या. हे परिस्थिती पाहता नालेसफाई केवळ नावालाच झाली असून पावसाळ्यापुर्वी नाल्यांमधील गाळ आणि घाण ठेकेदारांकडून प्रामाणिकपणे काढलाच गेला नाही हे स्पष्ट झाले आहे. क्षेत्रिय कार्यालय स्तरावर अधिकाºयांच्या सहकार्याने चालणारी नालेसफाईची ‘हात सफाई’ या पुरामध्ये उघडी पडली आहे.
====
महापालिकेमार्फत वारंवार पुरसदृश परिस्थिती निर्माण होणाºया ठिकाणी स्टॉर्म वॉट्रर मास्टर प्लान तयार करण्यात आला आहे. त्यासाठी ४८२ कोटी रुपयांचा सविस्तर प्रकल्प तयार करण्यात आला होता. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात (२०१७-१८) १७५ कोटी ५० लाख रुपये, दुसºया टप्प्यात (२०१८-१९) १०० कोटी खर्च करण्यात आला आहे. तर तिसºया टप्प्यासाठी ८६ कोटी रुपयांचे पुर्वगणक पत्रक तयार करुन निविदा काढण्यात आल्या आहेत. या मास्टर प्लानचा फल्ला उडाला असून शहरामध्ये गेल्या महिन्याभरात दोन वेळा पूर आला आहे. मुठा नदीला आलेल्या पुरामुळे नुकसान झाले. त्यानंतर आता ओढ्यांना आलेल्या पुरामुळे हाहाकार उडाला. पालिकेने ३०० कोटींपेक्षा अधिक खर्च करुनही पुरस्थिती का रोखता आली नाही असा प्रश्न आहे.
====
दरवर्षीच्या अंदाजपत्रकामध्ये नालेसफाईसाठी १०० ते १२५ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली जाते. क्षेत्रिय कार्यालयस्तरावर प्रत्येक नगरसेवकाला दहा लाख रुपयांपर्यंतची नाले सफाईची कामे करण्यासाठी निधी दिला जातो. चालू वर्षीच्या अंदाजपत्रकात १३० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. तर, गेल्या दोन वर्षाची मिळून २०० कोटींपेक्षा अधिक निधीची तरतूद करण्यात आली होती. परंतू, क्षेत्रिय कार्यालय स्तरावर असलेले ठेकेदार-अधिकारी आणि काही माननियांचे साटेलोटे नालेसफाईच्या आड आले. नाल्यांची पूर्ण सफाई न करताच अनेक ठेकेदारांची बिले काढली गेल्याचा आरोप होत आहे. या पूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते करीत आहेत.