ई-मेलच्या माध्यमातून सहा लाखांची फसवणूक
By admin | Published: October 23, 2014 05:14 AM2014-10-23T05:14:20+5:302014-10-23T05:14:20+5:30
ई-मेलमधून साडेसहा लाख रुपये हस्तांतरित करून फसवणूक केल्याप्रकरणी बँक आणि एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पिंपरी : ई-मेलमधून साडेसहा लाख रुपये हस्तांतरित करून फसवणूक केल्याप्रकरणी बँक आणि एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अविनाश चाळके (वय ४८, रा. चिंचवड) यांनी निगडी पोलिसात तक्रार दिली आहे.
निगडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक रंगनाथ उंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका भामट्याने चाळके यांचा ई-मेल आयडी चोरला. नंतर चाळके यांच्या ई-मेलवरून बँकेला पैसे हस्तांतरित करण्याचा मेल पाठविला. मात्र, त्यानंतर अॅम्बिशन एंटरप्रायझेस या नावाने बँकेने ६ लाख ४१ हजार रुपये हस्तांतरित केले. ही बाब चाळके यांनी बँकेच्या लक्षात आणून दिली. त्या बँकेने एका महिन्याच्या आतमध्ये रक्कम परत दिली जाईल, असे सांगितले. प्रत्यक्षात बँकेने परतावा दिला नाही. म्हणून त्यांनी तक्रार दिली आहे.’’ (प्रतिनिधी)