वीट तयार करण्याच्या कारखान्यात सहा लाखांची वीजचोरी
By admin | Published: July 28, 2016 04:11 PM2016-07-28T16:11:59+5:302016-07-28T16:11:59+5:30
दिपाली स्टोन क्रशर या सिमेंटचे ब्लॉक बनविणा-या कारखान्यामध्ये 43,974 युनिटची वीज चोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २८ : च-र्होली बुद्गुक (ता. हवेली) येथील दिपाली स्टोन क्रशर या सिमेंटचे ब्लॉक बनविणा-या कारखान्यामध्ये 43,974 युनिटची वीज चोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. तब्बल 6 लाख 1 हजार 410 रुपयांची वीजचोरी या प्रकरणी बुधवारी (दि. 27) स्टोन क्रशरचे प्रोप्रायटर सचिन तानाजी खांदवे यांच्या विरूद्ध महावितरणच्या रास्तापेठ येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती महावितरणचे जनसंपर्क अधिकारी निशिकांत राऊत यांनी दिली.
महावितरणच्या भोसरी विभागा अंतर्गत च-र्होली बुद्गुकमध्ये निगुर्डी-लोहगाव रस्त्यावर दिपाली स्टोन क्रशर या कारखान्याला महावितरणने औद्योगिक वीजजोडणी दिलेली आहे. या स्टोन क्रशरमध्ये सिमेंटच्या ब्लॉकची निमिर्ती करण्यात येते. गेल्या काही महिन्यांपासून महावितरणच्या तपासणीत या कारखान्यातील वीजवापराबाबत संशय निर्माण झाल्याने महावितरणकडून वीजमीटरच्या यंत्रणेची तपासणी करण्यात आली.
त्यात या कारखान्याच्या जवळच असलेल्या फिडर पिलरला थेट केबल जोडून वीजचोरी होत असल्याचे आढळून आले असल्याचे राऊत यांनी सांगितले. महावितरणचे अधीक्षक अभियंता महेंद्र दिवाकर , कायर्कारी अभियंता सुनील शिंदे अतिरिक्त कायर्कारी अभियंता अनिल वरपे, रमेश सुळ , अजित मस्के, विजयकुमार गलंडे, बाळासाहेब तापकिर, सतीश राख, रवीकिरण मुंडे, किरण शिंदे, राहुल पाठक यांच्या पथकाने ही वीज चोरी उघडकीस आणली आहे.