मावळातील सहा केंद्रे संवेदनशील
By admin | Published: October 10, 2014 06:22 AM2014-10-10T06:22:57+5:302014-10-10T06:22:57+5:30
मावळ विधानसभा मतदारसंघात सहा संवेदनशील मतदान केंद्र आहेत, तर १२ दुर्गम मतदान केंद्र आहेत. ३४० मतदान केंद्र आहेत,
वडगाव मावळ : मावळ विधानसभा मतदारसंघात सहा संवेदनशील मतदान केंद्र आहेत, तर १२ दुर्गम मतदान केंद्र आहेत. ३४० मतदान केंद्र आहेत, त्यासाठी २,२४४ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत, अशी माहिती तहसीलदार शरद पाटील यांनी दिली.
तळेगाव दाभाडे येथील सरस्वती शाळा १९५ , इंद्रायणी महाविद्यालय १९९, नवीन समर्थ विद्यालय २०६, गुलाबी शाळा २०२, वडगाव येथील १५० व १५९ ही ६ मतदान केंद्र संवेदनशील आहेत. सावळा १, माळेगाव बुद्रुक २, खांड ३, डाहुली १०, कुसुर ११, शिर्दे सोमवंडी १४, उढेवाडी २३, शिरे १०१, कोळे चाफेसर २३८, डोणे ३०७ व ओव्हळे ३२४ असे एकूण १२ दुर्गम मतदान केंद्र आहेत. इतर ३११ मतदान केंद्र व ११ सहायक मतदान केंद्र असे एकूण ३४० मतदान केंद्र आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर केंद्राध्यक्ष , ३ मतदान अधिकारी, शिपाई व पोलीस कर्मचारी असे ६ कर्मचारी नियुक्त आहेत. ४ भरारी पथके, ४ निवडणूक वाहन तपासणी पथके, ४ व्हिडिओ शूटिंग पथकेकार्यरत आहेत. (वार्ताहर)