एक कोटींच्या बिटकॉईनची परस्पर विक्री केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 15:49 IST2018-03-16T15:49:31+5:302018-03-16T15:49:31+5:30
एक कोटी रुपयांच्या बिटकॉइनची परस्पर विक्री करुन फसवणूक केल्याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एक कोटींच्या बिटकॉईनची परस्पर विक्री केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल
पिंपरी : एक कोटी रुपयांच्या बिटकॉइनची परस्पर विक्री करुन फसवणूक केल्याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भिमसेन आगरवाल (वय ६५, रा. प्राधिकरण, निगडी) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी गेन बिटकॉईन कंपनीचे संचालक अमित भारद्वाज, अजय भारद्वाज,रुपेश सिंग , हेमंत चव्हाण , हेमंत सूर्यवंशी , काका रावडे या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी अगरवाल यांना बिटकॉईन कंपनीत गुंतवणूक करण्यास भाग पाडून त्यांना मोबदल्याची मोठी आमिषे दाखविली. सुमारे एक कोटी रुपयांचे बिटकॉईन विकत घेवून त्यांच्या गेन बिटकॉईन या कंपनीत गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यानंतर हे बिटकॉईन विश्वासघाताने परस्पर विक्री करुन त्याचा ठरल्याप्रमाणे आगरवाल यांना परतावा दिला नाही. तसेच गुंतविलेल्या बिटकॉईनची किंमत परत न करता आगरवाल यांची सुमारे एक कोटींची फसवणूक केली.