वाळूने भरलेली ट्रक रिकामे केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल ..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:09 AM2021-03-22T04:09:39+5:302021-03-22T04:09:39+5:30

शिरूरच्या तहसीलदार लैला शेख यांना ही घटना कळताच त्यांनी तत्काळ फुटेज तपासून आरोपींवर गुन्हा दाखल करण्यांचे आदेश दिले. त्यांच्या ...

Six persons have been booked for emptying a truck full of sand. | वाळूने भरलेली ट्रक रिकामे केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल ..

वाळूने भरलेली ट्रक रिकामे केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल ..

googlenewsNext

शिरूरच्या तहसीलदार लैला शेख यांना ही घटना कळताच त्यांनी तत्काळ फुटेज तपासून आरोपींवर गुन्हा दाखल करण्यांचे आदेश दिले. त्यांच्या आदेशानुसार येथील तलाठी सरफराज देशमुख यांनी फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी विजय धोंडीबा कोळपे (रा. निमोणे, कुऱ्हाडवाडी ता. शिरूर), सुरेश ठकाजी पाचर्णे (रा. तरडोबाचीवाडी, पुणे), संभाजी गुंजाळ (महसूल सहायक), नारायण डामसे (दोघेही तहसील कार्यालय कर्मचारी), संतोष गिरमकर (कुऱ्हाडवाडी, निमोणे, शिरूर), महेश अनुसे (निमोणे, ता. शिरूर) या सहा जणांना या प्रकरणी अटक केली आहे.

याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती चार मार्च रोजी मंडलाधिकारी तीर्थगिरी गोसावी यांनी अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा ट्रक (एमएच १२ आरएम ९९७०) कुऱ्हाडवाडी परिसरात मिळून आला होता. त्याचा पंचनामा करून त्याचा ब्रास वाळू मिळून आली होती. सदर हायवा ट्रक पुढील कारवाईसाठी शिरूर तहसील कार्यालय येथे लावण्यात आला. यासाठी हायवा ट्रक मालक विजय कोळपे याला तहसील कार्यालय यांच्याकडून ४ लाख ४७ हजार ७७५ रुपये दंडाची नोटीस दिली होती. 19 मार्च रोजी रात्री पावणे बारा वाजताच्या सुमारास ते 20 मार्च पावणेएकच्या दरम्यान हायवा ट्रकचे मालक विजय कोळपे यांना दंडाची नोटीस दिली असताना सदर दंड कमी करण्यासाठी विजय कोळपे याने संभाजी गुंजाळ, नारायण डामसे, सुरेश पाचर्णे, संतोष गिरमकर, महेश अनुसे या सर्वांनी मिळून महसूल कार्यालय शिरूरमधील शिपाई यांना हाताशी धरून हायवा ट्रक तो तहसील कार्यालयाचे गेटमधून बाहेर नेऊन त्यामध्ये असलेली अवैध वाळू अंदाजे पाच ब्रास कोठेतरी टाकून दिली आहे. पुन्हा ट्रक तहसील कार्यालयाचे गेटमध्ये आत आणून लावला आहे. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेने हा गुन्हा उघडीस आला आहे.

आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे करीत आहे.

Web Title: Six persons have been booked for emptying a truck full of sand.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.