कापूरव्होळ येथील सहा दुकाने सात दिवसांसाठी सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:09 AM2021-05-22T04:09:51+5:302021-05-22T04:09:51+5:30
सहायक पोलीस निरीक्षक राहुल साबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कापूरव्होळ येथील संबंधित सहा दुकानदारांनी कोरोना साथ प्रतिबंधातमक नियम न पाळल्याने ...
सहायक पोलीस निरीक्षक राहुल साबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कापूरव्होळ येथील संबंधित सहा दुकानदारांनी कोरोना साथ प्रतिबंधातमक नियम न पाळल्याने भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियमप्रमाणे या दुकानचालकांनी फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम न पाळता ग्राहकांना दुकानात बसवून, गर्दी करून मालाची विक्री करताना आढळल्याने कापूरव्होळ येथील आंनद पान शाॅप, योगीराज क्लाॅथ सेंटर, धनश्री पान शाॅप, जनता बेकरी, वंदे मातरम मंगल साहित्य केंद्र, हिना बेकरी ही दुकाने पुढील सात दिवस सील करण्यात आली आहे. राजगड पोलिसांनी भोरचे तहसीलदार अजित पाटील यांच्या आदेशाने ही कारवाई केली आहे.
भोर तालुक्यात बाजारपेठेतील दुकानदारांनी नियमाचे पालन न केल्यास गुन्हा दाखल केला जाणार असून दुकाने सील केली जाणार आहेत. भोर तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढून रूग्ण संख्या वाढू नये याकरिता प्रशासनाकडून कडक नियमाची अंमलबजावणी केली जात आहे. तरीही महामार्गावरील बाजारपेठेतून विविध दुकानात मोठी गर्दी होताना दिसत आहे. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही नागरिक फारसे गांभिर्याने घेताना दिसत नाहीत. कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाच्या प्रतिबंध व नियंत्रण बाबतचे सुधारित आदेश आल्याने राजगड पोलिसांनी ही कारवाई केली.
२१ नसरापूर
कापूरव्होळ येथील दुकाने सील करताना प्रशासकीय अधिकारी.