बासमती निर्यातीची सहा राज्यांनाच परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 04:22 AM2017-10-29T04:22:36+5:302017-10-29T04:22:53+5:30
काही वर्षांत जगभरातून भारतातील बासमती तांदळाला मागणी वाढत आहे. यामुळे बासमतीची निर्यात चांगलीच वाढली असून, वर्षभरात तब्बल १८ लाख ४६ हजार टन बासतमी तांदूळ
पुणे : काही वर्षांत जगभरातून भारतातील बासमती तांदळाला मागणी वाढत आहे. यामुळे बासमतीची निर्यात चांगलीच वाढली असून, वर्षभरात तब्बल १८ लाख ४६ हजार टन बासतमी तांदूळ निर्यात करण्यात आला आहे. ही मागणी कायम ठेवण्यासाठी व बासमतीचा दर्जा टिकविण्यासाठी भारतीय कृषी अनुसंधान संस्थेने उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, जम्मू काश्मीर, हरियाना, आणि हिमाचल प्रदेश या सहा राज्यातूनच बासमती तांदूळ निर्यांत करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात तांदळाचा नवीन हंगाम पंधरा दिवसांत सुरु होत आहे.
भारतात बहुतेक सर्वच भागात तांदळाचे उत्पादन होते.
यामध्ये उत्तर भारतातील राज्ये बासमती तांदूळ उत्पादनामध्ये आघाडीवर आहेत. गेल्या काही वर्षांत भारतातील तांदळाला प्रामुख्याने बासमतीला जगभरातून चांगली मागणी आहे. परंतु बासमती तांदळामध्ये होणारी भेसळ व दर्जा कायम ठेवण्यासाठी व हा
बासमती आयात करणा-या देशाकडून तो नाकारण्याचे प्रमाण करण्यासाठी देशातील सहाच राज्यातील बासमती तांदूळ निर्यात करण्याचा निर्णय भारतीय कृषी अनुसंधान संस्थेने घेतला आहे. अन्य राज्यातील तांदूळ हा ‘नॉन बासमती’ म्हणून निर्यात होणार असल्याची माहिती तांदळाचे व्यापारी राजेश शहा यांनी सांगितले.
भारतीय कृषी अनुसंधान संस्थेच्या या निर्णयामुळे मुळे मात्र बासमती व नॉन बासमतीचे दर कमी होऊ शकतात, असे ही त्यांनी स्पष्ट केले.
भारतातून तांदळाची निर्यात दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु निर्यात वाढत असताना बासमती तांदूळ आयातदार देशांकडून नाकारला जाण्याचे प्रकारही वाढत आहे. यात प्रामुख्याने बासमतीच्या संकरित जाती आणि अतिरिक्त रासायनिक खतांचा वापर करून पिकविलेल्या तांदळाचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवरभारतीय कृषी अनुसंधान संस्थेने सरसकट बासमती निर्यात करण्यास बंदी घातली आहे, असेही शहा यांनी सांगितले.