आंजर्ले येथील समुद्र किनाऱ्यावर पुण्यातील सहा पर्यटक बुडाले; तिघांना वाचवण्यात यश
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2020 02:43 PM2020-12-18T14:43:43+5:302020-12-18T17:10:45+5:30
पाण्याचा अंदाज न आल्याने सहा जण पर्यटक पाण्यात बुडाले.
पुणे : पुण्यातील औंध येथून १४ पर्यटक फिरण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात गेले होते. शुक्रवारी(दि. १८) हे पर्यटक दुपारच्यास सुमारास आंजर्ले येथील समुद्रात पोहण्यासाठी उतरले. मात्र,पाण्याचा अंदाज न आल्याने सहा जण पर्यटक पाण्यात बुडाले.त्यात तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून स्थानिकांच्या मदतीने तिघांना वाचवण्यात यश आले आहे.
पुण्यातील औंध येथून दापोली तालुक्यातील आंजर्लेला एका कंपनीतील 14 तरूण मुले शुक्रवारी (18 डिसेंबर) गेली होती. त्यातील सहा जण सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास समुद्रात पोहोण्यासाठी गेले असता पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते पाण्यात बुडाल्याची दुर्देवी घटना घडली. त्यातील तीन तरूणांचा दुर्देवी मृत्यू झाला असून, स्थानिक युवकांच्या मदतीने तीन जणांना वाचवण्यात यश आले आहे. पर्यटनसाठी आलेल्या आपल्या मित्रांवर काळाने घाला घातल्याने त्यांच्या मित्रांना धक्का बसला आहे. मृत पावलेल्या तरूणांच्या कुटुंंबांवरही शोककळा पसरली आहे.
अक्षय राखलेकर (वय 25), विक्रम श्रीवास्तव (वय 24), मनोज गावंडे (वय 24) अशी मृत्यू झालेल्या तरूणांची नावे आहेत. तर रोहित पलांडे, उबेद खान आणि निहाल चव्हाण यांना वाचविण्यात यश मिळाले आहे. त्यांच्यावर आंजर्लेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
एका कंपनीत काम करणारी 14 तरूण मुले शुक्रवारी ( 18 डिसेंबर) पर्यटनासाठी आंजर्ले (ता.दापोली) येथे गेली होती. त्यातील सहा तरूणांना समुद्रामध्ये जाण्याचा मोह झाला आणि ते समुद्रात उतरले. मात्र पोहताना त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. ते बुडायला लागले. तिथल्या एका छोट्या मुलाने ते पाहिले आणि त्याने धावत जाऊन स्थानिक युवकांना माहिती दिली. दरम्यान, या दुर्घटनेची माहिती समजताच दापोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक युवकांनी मोठ्या शर्थीने या सहा तरूणांना बाहेर काढले. पण दुर्देवाने त्यातील तीन तरूण हे बुडाले.
--------------------------------------------------------------------------------