लक्ष्मीनगर, येरवडा परिसरात सहा दुचाकी जाळल्या; तीन संशयित ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 01:34 PM2020-10-16T13:34:40+5:302020-10-16T13:35:26+5:30
पुणे (येरवडा) : येरवड्यातील लक्ष्मीनगर परिसरात सराईत गुन्हेगारांनी शुक्रवारी पहाटे सहा चाकी पेटवून दिल्या. गाड्या उभ्या करण्याच्या वादातून हा ...
पुणे (येरवडा) : येरवड्यातील लक्ष्मीनगर परिसरात सराईत गुन्हेगारांनी शुक्रवारी पहाटे सहा चाकी पेटवून दिल्या. गाड्या उभ्या करण्याच्या वादातून हा प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी सोमनाथ सोपान गायकवाड यांनी फिर्याद दिली असून तीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
लक्ष्मीनगर येथील संतोष मित्र मंडळजवळ शुक्रवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास दुचाकी पेटवल्या असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. घराबाहेर दुचाकी उभी करण्याच्या वादातून स्थानिक सराईत आरोपींनी हा प्रकार केल्याचे समजते. रात्रगस्त अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक बलभीम ननावरे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या घटनेत 6 दुचाकीसह एक सायकल जाळण्यात आली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी संबंधित आरोपींविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल केला असून संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. घटनास्थळी गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त बच्चन सिंग, सहाय्यक पोलीस आयुक्त (येरवडा) किशोर जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे)लक्ष्मण बोराटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख गुन्हे निरीक्षक अजय वाघमारे, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अंजुम बागवान यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. लक्ष्मीनगर परिसरातील सराईत गुन्हेगारांनी दहशत पसरविण्यासाठी हे कृत्य केल्याचे समजते. आगामी काळात येरवडा परिसरातील सराईत गुन्हेगारांची दहशत कमी करण्यासाठी येरवडा पोलिसांनी कठोर कारवाईचे आदेश सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर जाधव यांनी दिले आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश भांगे करत आहेत.