खेडच्या सहा गावांना मिळाले पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2016 12:42 AM2016-06-03T00:42:57+5:302016-06-03T00:42:57+5:30
खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील शिरगाव, मोरोशी, धुवोली, वांजळे, धामणगाव, डेहणे या सहा गावांसाठी गुरुवारी पाभे बंधाऱ्यातून पाणी सोडण्यात आले.
चासकमान : खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील शिरगाव, मोरोशी, धुवोली, वांजळे, धामणगाव, डेहणे या सहा गावांसाठी गुरुवारी पाभे बंधाऱ्यातून पाणी सोडण्यात आले.
खेड तालुक्याच्या आदिवासी भागातील सहा गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली होती. नागरिकांना आणि जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी वणवण करावी लागत होती. चासकमान धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी झाल्याने या गावांना पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली होती. यासाठी या सहा गावांतील ग्रामस्थांनी पाभे बंधाऱ्यातून पाणी सोडण्याची मागणी केली होती. खेड तालुका भाजपा अध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अतुल देशमुख खडकवासला पाटबंधारे विभाग पुणे शाखा अभियंता एस. एन. भुजबळ यांना भेट घेऊन मागणी केली. त्यानंतर भुजबळ यांनी आदेश दिल्यानंतर पाटबंधारे कर्मचारी के. एस. दाते यांनी लगेच बंधाऱ्यातून पाणी सोडले. या वेळी सचिन लांडगे, भाजपा नेते शंकर कोरडे, तुकाराम भोकटे, सरपंच नीलम खंडागळे, माजी सरपंच सुनील भालेराव, माजी सरपंच, विठ्ठल विरणक, दत्ताशेठ खाडे, महादू खंडागळे, सुदाम सोळशे, संतोष मराडे, हरिचंद्र कोरडे, बाळा शेटे, अनिल सोळशे, लक्ष्मण बांबळे, बाबूराव जठार, समीर कोरडे, शंकर कशाळे, पिंटू भालेराव, गणेश जठार इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते. बंधाऱ्यातून पाणी सोडल्यामुळे शिरगाव, धुवोली, डेहणे, मंदोशी, वांजळे, शेंदुर्ली या गावांतील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. पाणी सोडल्यानंतर परिसरातील नागरिकांनी देशमुख यांचे आभार मानले.