सहा वर्षांच्या चिमुरड्याने साडेतीन तासांत सर केले कळसुबाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:11 AM2021-03-16T04:11:35+5:302021-03-16T04:11:35+5:30

नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवर असणारे सह्याद्री पर्वत रांगेतील राज्यातील १,६४६ मीटर उंचीचे सर्वोच्च शिखर म्हणजे कळसुबाई होय. हे ...

Six-year-old Chimurda made Sir Kalsubai in three and a half hours | सहा वर्षांच्या चिमुरड्याने साडेतीन तासांत सर केले कळसुबाई

सहा वर्षांच्या चिमुरड्याने साडेतीन तासांत सर केले कळसुबाई

Next

नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवर असणारे सह्याद्री पर्वत रांगेतील राज्यातील १,६४६ मीटर उंचीचे सर्वोच्च शिखर म्हणजे कळसुबाई होय. हे शिखर अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामध्ये आहे. हे शिखर सर करण्यासाठी अनुभवी ट्रेकर्सचीही चांगलीच दमछाक होते. मात्र, खेळण्या बागडण्याचे वय असलेल्या साईने अत्यंत कमी वेळात कळसुबाई शिखरावर यशस्वी चढाई केल्याने, त्याच्यावर परिसरातून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. साईने सकाळी सात वाजता चढाईला सुरुवात केली व साडेदहा वाजता कळसुबाई शिखरावर पोहोचला. सोबत आदर्श शिक्षक बाळासाहेब गरकळ, विकास कानडे, विशाखा कानडे, सृष्टी कानडे, प्रिशा गरकळ हे होते. दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर साईने न थकता कळसुबाई शिखर सर केले. सानेगुरुजी कथामाला पुणे जिल्हा समिती ग्रामीणचे अध्यक्ष बाळासाहेब कानडे, सचिव चांगदेव पडवळ, ज्ञानलक्ष्मी राष्ट्रीय विकास प्रतिष्ठानच्या मनीषा कानडे, साईचे वर्गशिक्षक संतोष कानडे, आदर्श शिक्षक संतोष थोरात आदींनी साईचे कौतुक केले.

Web Title: Six-year-old Chimurda made Sir Kalsubai in three and a half hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.