आंबेगाव तालुक्यात २०० फूट खोल बोअरवेलमध्ये पडला ६ वर्षांचा चिमुकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 08:07 PM2019-02-20T20:07:29+5:302019-02-20T20:07:54+5:30

शेतातील रस्त्याच्या कडेला असलेल्या खेळता खेळता बोअरवेलमध्ये ६ वर्षांचा चिमुकला पडला...

Six years old children fell into 200 feet deep borewell in Ambegaon taluka | आंबेगाव तालुक्यात २०० फूट खोल बोअरवेलमध्ये पडला ६ वर्षांचा चिमुकला

आंबेगाव तालुक्यात २०० फूट खोल बोअरवेलमध्ये पडला ६ वर्षांचा चिमुकला

googlenewsNext
ठळक मुद्देमुलाला सुखरूप बाहेर काढण्यासाठी शर्थींचे प्रयत्न सुरु 

आंबेगाव : निरगुडसर (ता.आंबेगाव) परिसरातील रांजणी जाधववाडी येथे शेतातील रस्त्याच्या कडेला असलेल्या खेळता खेळता बोअरवेलमध्ये ६ वर्षांचा चिमुकला पडला. त्याला सुखरुर बाहेर काढण्यासाठी एन.डी.आर. एफ च्या जवानांना पाचारण करण्यात आले. मात्र, काही तासांच्या अथक प्रयत्नानंतरही मुलाला काढण्यात यश आलेले नाही. रवि पंडीत मिल असे ह्या चिमुकल्याचे नाव आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संपत जाधव यांच्या शेताजवळ बोअरवेलमध्ये पडलेला मुलगा हा रस्त्याचे काम करणाºया मजुरांचा मुलगा असुन दुपारच्या सुमारास रस्त्याचे काम करत असताना हा मुलगा आई-वडिलांची नजर चुकवून त्याठिकाणी खेळत असताना ही घटना घडली.ज्या बोअरवेल मध्ये हा मुलगा पडला तो बोअरवेल सुमारे २०० फूट खोल आहे. सुदैवाने मुलगा १० ते १५ फूट खोलीवर अडकल्याचे प्रत्यक्षदर्शिनी सांगितले. हा मुलगा मुळचा शेगावचा असुन रविचे आई वडील रोड वरती मजुरीने काम करतात.
 मंचर पोलीस घटना स्थळी दाखल झाले असुन मुलाला सुखरूप वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहे.
---------------------------------------------

Web Title: Six years old children fell into 200 feet deep borewell in Ambegaon taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.