सॅनिटरी नॅपकिनला करातून वगळा

By admin | Published: June 21, 2017 06:28 AM2017-06-21T06:28:17+5:302017-06-21T06:28:17+5:30

सांगवीतील सखी महिला बचत गटाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या मार्गदर्शनाखाली अर्थमंत्री अरुण जेटली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पोस्टाद्वारे सॅनिटरी नॅपकिन भेट

Skip the sanitary napkins to the tax | सॅनिटरी नॅपकिनला करातून वगळा

सॅनिटरी नॅपकिनला करातून वगळा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपळे गुरव : सांगवीतील सखी महिला बचत गटाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या मार्गदर्शनाखाली अर्थमंत्री अरुण जेटली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पोस्टाद्वारे सॅनिटरी नॅपकिन भेट म्हणून पाठवून सॅनिटरी नॅपकिनवरील जीएसटी कर रद्द करण्याची मागणी करण्यात आली. सॅनिटरी नॅपकिन करमुक्त उत्पादनामध्ये समाविष्ट करावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
सॅनिटरी नॅपकिन्स बाजारात स्वस्त दरात उपलब्ध नाहीत, याचा अर्थ ती चैनीची वस्तू आहे असा होत नाही. सॅनिटरी नॅपकिन्सच्या वापराबद्दल जागरुकता निर्माण होत असताना त्यावर कर लावणे अत्यंत चुकीचे आहे. ते महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे सॅनिटरी नॅपकिन करमुक्त उत्पादनामध्ये समाविष्ट करावेत, तसेच त्यावर लावण्यात आलेला जीएसटी कर रद्द करावा, अशी मागणी सखी महिला बचत गटाच्या अध्यक्षा आरती राव यांनी केली.

Web Title: Skip the sanitary napkins to the tax

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.