अकस्मात मृत्यूंच्या तपासात ढिलाई
By admin | Published: November 24, 2014 11:46 PM2014-11-24T23:46:43+5:302014-11-24T23:46:43+5:30
पोलिसांमध्ये कमालीची उदासीनता असून, गेल्या काही वर्षामधील थोडी थोडकी नव्हे, तर तब्बल आठ हजार प्रकरणो प्रलंबित असल्याची माहिती समोर आली आहे.
Next
पुणो : आत्महत्या आणि अकस्मात मृत्यूच्या प्रकरणांमध्ये (एडी) दाखल झालेल्या गुन्ह्यांचा तपास लावण्यामध्ये पुणो शहर पोलिसांमध्ये कमालीची उदासीनता असून, गेल्या काही वर्षामधील थोडी थोडकी नव्हे, तर तब्बल आठ हजार प्रकरणो प्रलंबित असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणांचा तपास लावून त्यामधील तथ्य बाहेर काढण्यामध्ये मात्र पोलिसांनाच रस नसल्याचे चित्र असल्यामुळे न्यायाची अपेक्षा करीत असलेल्या नागरिकांच्या हाती केवळ निराशा पडत आहे.
गळफास घेऊन, विष पिऊन, इमारतीवरून उडी मारून, रेल्वेखाली केलेल्या आत्महत्यांचे प्रमाण वाढत चाललेले आहे. यासोबच शहरात मोठय़ा प्रमाणावर बांधकामे सुरू आहेत. उंच आणि बहुमजली इमारतींवरून काम करताना खाली पडून, काम करताना दुर्घटना घडल्यामुळे झालेल्या मृत्यूप्रकरणी पोलीस अकस्मात मृत्यूची नोंद करतात. या प्रकरणांमध्ये बहुतांशी गुन्हे हे शेवटर्पयत अकस्मात मृत्यू असेच राहतात. वास्तविक त्यामध्ये संबंधित ठेकेदारावर आणि मुख्य म्हणजे बांधकाम व्यावसायिकावर गुन्हे दाखल होण्याची आवश्यकता आहे. परंतु पोलीस फारच दबाव वाढला तर केवळ ठेकेदारावर गुन्हा दाखल करतात. सुरक्षेची साधने न पुरविल्याचा त्याच्यावर ठपका ठेवला जातो. गेल्या काही वर्षामधील अकस्मात मृत्यूची प्रकरणो प्रलंबित असल्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत होती.
ही प्रलंबित प्रकरणो तपासावर घेण्यासाठी पोलीस ठाणो स्तरावर मोठी उदासीनता पाहायला मिळते आहे. एका एका पोलीस ठाण्यामध्ये 100 ते 300 पेक्षा अधिक प्रकरणो प्रलंबित आहेत. त्याचा तपास लागणार कधी आणि कसा याबाबतच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
कारण अकस्मात मृत्यूमागील नेमके सत्य समोर येऊ शकणार नाही. हे गुन्हे प्रलंबित राहिल्यामुळे पुरावे नष्ट होण्याची शक्यता अधिक असते.
न्यायवैद्यक विभागाकडून तपासाचा मार्ग मोकळा
नुकतीच राज्यातील तब्बल अडीच हजार प्रकरणो न्यायवैद्यक प्रयोगशाळेने निकाली काढली आहेत. अनेकदा पोलीस ठाण्यांकडून तपासादरम्यान अद्याप न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवालच प्राप्त झालेला नाही, अशी उत्तरे दिली जातात. विषचिकित्सा, जीवशास्त्र, सर्वसाधारण, प्रोहिबिशन, डीएनए, बॅलिस्टिक्स, सायबर, टीएएसआय अशा प्रकारांमधील ही प्रकरणो निकाली काढल्यामुळे अकस्मात मृत्यूंच्या तपासाचा मार्गही मोकळा झाला होता. परंतु, पोलीस ठाण्यांची उदासीनता याच्याही आड आल्यामुळे अद्यापही शहरातील हजारो प्रकरणो प्रलंबित आहेत.
वरिष्ठांच्या सूचना; तरी गती नाही
उत्तर विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रकाश मुत्याळ आणि दक्षिण विभागाचे अतिरिक्त आयुक्त चंद्रशेखर दैठणकर यांनी पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिका:यांना या प्रलंबित प्रकरणांची निर्गती करण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रलंबित असलेली ही प्रकरणो तत्काळ तपास लावून मार्गी लावण्याच्या सक्त सूचना या अधिका:यांनी दिल्यामुळे पोलीस ठाणो स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत; परंतु त्याचा वेग वाढण्याची आवश्यकता आहे.