बिबवेवाडीत वृक्षांची कत्तल
By admin | Published: January 13, 2017 03:19 AM2017-01-13T03:19:10+5:302017-01-13T03:19:10+5:30
महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने याच बिबवेवाडी येथे तब्बल १४९ झाडांची कत्तल करण्याची परवानगी दिली आहे
पुणे : महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने याच बिबवेवाडी येथे तब्बल १४९ झाडांची कत्तल करण्याची परवानगी दिली आहे. महापालिका निवडणूक जाहीर होताच वृक्षतोड सुरू झाली आहे.
बिबवेवाडी येथील सर्व्हे क्रमांक 665-अ मध्ये निलगिरी, स्पॅथोडीर्या, सुबाभूळ, आ. बाभूळीची 20 ते 25 वर्ष वयाची 205 झाडे आहेत. यापैकी 149 झाडांना पुर्णपणे काढून टाकण्याची परवानगी दिले आहे तर 56 वृक्षांना पुनर्रोपण करण्याची अट घालण्यात आली आहे. वृक्ष प्राधिकरण समितीने ३ डिसेंबर २०१६ रोजी या वृक्षतोडीस मान्यता दिली आहे. याकरीता महापालिकेने केवळ 20 लाख 50 हजार रुपयांची आकारणी केली आहे. प्राईड पर्पल लॅण्डमार्कच्या वतीने वृक्ष प्राधिकरण समितीला वृक्षतोड करण्यासाठी परवानगी मागण्यात आली होती.
वृक्ष प्राधिकरण विभागाचे अधिकारी बाळासाहेब डोळस यांनी सांगितले की, वृक्षतोडीची परवानगी मागणाऱ्यास १ झाड तोडण्याच्या बदल्यात ३ झाडे लावण्याची अट आहे. एका वृक्षतोडीची परवानगी देण्याकरीता 10 हजार रुपये डिपॉझीट घेतले जाते. अर्जदाराने एक वृक्षतोड करून इतर तीन झाडांची लागवड करून त्याचे व्यवस्थित संगोपन केले तरच ही रक्कम परत करण्यात येते अन्यथा ही रक्कम जप्त केली जाते.