फ्लेक्स दर्शनासाठी वृक्षांची कत्तल

By admin | Published: September 23, 2015 03:27 AM2015-09-23T03:27:34+5:302015-09-23T03:27:34+5:30

मुळशी तालुक्यात सर्वच महत्त्वाच्या रस्त्यांवर सध्या व्यावसायिक फ्लेक्सबाजांकडून जाहिरातीच्या व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात लोखंडी होर्डिंग उभी केली जात असून

Slaughter of trees for flakes | फ्लेक्स दर्शनासाठी वृक्षांची कत्तल

फ्लेक्स दर्शनासाठी वृक्षांची कत्तल

Next

पुणे : मुळशी तालुक्यात सर्वच महत्त्वाच्या रस्त्यांवर सध्या व्यावसायिक फ्लेक्सबाजांकडून जाहिरातीच्या व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात लोखंडी होर्डिंग उभी केली जात असून, या होर्डिंगच्या दर्शनासाठी आड येणाऱ्या वडासारख्या अनेक जुन्या मोठमोठ्या वृक्षांची खुलेआम कत्तल सुरू आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते.
एका बाजूला तालुक्यात रस्त्याच्या दुरुस्तीबाबत उदासीन असलेला सार्वजनिक बांधकाम विभाग आता रस्त्याच्या कडेला असलेल्या वृक्षसंवर्धनाच्या बाबतीतही उदासीन असल्याचे दिसून येते.
रहदारीला अडथळा ठरणारी काटेरी झाडेझुडपे तोडण्याची मागणी सामान्य नागरिक करीत असताना ती न तोडता चांगल्या पटांगणाच्या जागी वाढलेले मोठमोठे वृक्ष तोडायला बांधकाम विभागातर्फे परवानगी कशी मिळते, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडत आहे. पुणे-महाड रस्त्यावर चांदणी चौकापासून पौडपर्यंत किमान दोनशे मोठी होर्डिंग उभारलेली आहेत.
या होर्डिंगमागील वर्षभरात किमान ६७ झाडांची काही झाडांची अर्धी व काही झाडांची पूर्ण कत्तल करण्यात आल्याचे एका संस्थेने केलेल्या पाहणीतून समोर आले आहे.
या फ्लेक्स व्यावसायिकांबरोबर बांधकाम खात्याच्या जबाबदार अधिकाऱ्यांचे काही साटेलोटे तर नाही ना, अशी शंका नागरिकांना येत आहे. संबंधित रस्त्यावरील किती होर्डिंगधारकांनी परवाना घेतला आहे अथवा किती जणांनी संबधित खात्याची परवानगी घेतलेली नाही, हा प्रश्नही गुलदस्तातच आहे. एका बाजूला मुळशीतील संपत चाललेली वृक्षसंपदा व त्याचा इथल्या पर्यावरणावर झालेला परिणाम लक्षात घेऊन शासन या भागातील काही गावांत इको सेन्सेटीव्ह झोन आणू इच्छित असतानाच काही निवडक लोकांच्या हिताकरिता पर्यावरणाचा समतोल राखणारी मोठमोठी झाडे विनाकारण तोडताना पाहून कोणाही पर्यावरणवादी व्यक्तीला हळहळ वाटल्यावाचून राहणार नाही.

Web Title: Slaughter of trees for flakes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.