पीकविम्यावरून शेतकरी संघटनेचे विमा कंपनीत झोपून आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:11 AM2021-03-26T04:11:34+5:302021-03-26T04:11:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शेतकऱ्यांना पीकविम्याची भरपाई देण्यास टाळाटाळ करत असल्याचा निषेध म्हणून शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी (दि. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शेतकऱ्यांना पीकविम्याची भरपाई देण्यास टाळाटाळ करत असल्याचा निषेध म्हणून शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी (दि. २५) सकाळी भारती एक्सा कंपनीच्या कार्यालयात झोपून मुक्काम आंदोलन सुरू केले.
संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड यांनी सांगितले की मागील आंदोलनात १० दिवसांत राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा करण्याचे आश्वासन कंपनीने दिले होते. त्याचे पालन झाले नाही. अजूनही अनेक शेतकरी प्रतीक्षा करत आहेत, पण कंपनीला त्याचे काही सोयरसुतक नाही.
आता जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात दाव्याप्रमाणे पैसे जमा होत नाहीत, तोपर्यंत कार्यकर्ते कंपनीच्या कार्यालयात झोपून मुक्काम ठोकतील, असे गायकवाड म्हणाले. दयानंद चौधरी, गोटू पाटील, अरविंद चौधरी, बजरंग चौधरी, नितीन कदम, बाजीराव चौधरी, श्रीहरी गायकवाड, सिध्दार्थ चौधरी, समाधान आगलावे, अकबर शेख आदी शंभरहून जास्त कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले आहेत.