तापमानात पुन्हा काहीशी वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:10 AM2021-01-18T04:10:50+5:302021-01-18T04:10:50+5:30
पुणे : राज्यात शनिवारी विदर्भासह अनेक ठिकाणच्या किमान तापमानात घट झाली होती. रविवारी सकाळी पुन्हा त्यात काहीशी वाढ झाल्याचे ...
पुणे : राज्यात शनिवारी विदर्भासह अनेक ठिकाणच्या किमान तापमानात घट झाली होती. रविवारी सकाळी पुन्हा त्यात काहीशी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. संपूर्ण राज्यात अजूनही किमान तापमान सरासरीच्या तुलनेत अधिक दिसत आहे. राज्यात सर्वात कमी किमान तापमान गोंदिया येथे ११.५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. ते सरासरीच्या तुलनेत १.६ अंश सेल्सिअसने कमी आहे. गोंदियाचा अपवाद वगळता इतरत्र ते जास्त आहे.
मध्य महाराष्ट्राच्या बऱ्याच भागांत तर मराठवाड्याच्या काही भागांत किमान तापमान सरासरीच्या तुलनेत ५ ते ८ अंशांनी वाढले आहे. कोकणात १ ते ३ अंशाने वाढलेले दिसून येत आहे. मराठवाड्यातही किमान तापमान ४ ते ६ अंशाने वाढले आहे. पुढील चार दिवस राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. २१ जानेवारीपर्यंत राज्यातील बहुतांश भागांतील किमान तापमान सरासरीइतके खाली येण्याची शक्यता आहे.
राज्यातील प्रमुख शहरातील किमान तापमान (अंंश सेल्सिअस) पुणे १६.७, लोहगाव १८.१, जळगाव १८.५, कोल्हापूर २०.८, महाबळेश्वर १६.६, मालेगाव १८.६, नाशिक १६.४, सांगली २०.१, सातारा १८, सोलापूर १९.१, मुंबई २०.६, सांताक्रुझ १८.२, अलिबाग १८.३, रत्नागिरी १९.८, पणजी १३.८, डहाणु १७.२, औरंगाबाद १७.९, परभणी १८.१, नांदेड १८.१, बीड १९.६, अकोला १७.९, अमरावती १७.१, ब्रम्हपूरी१२.३, चंद्रपूर १५.६, गोंदिया ११.५, नागपूर १३.४, वाशिम १७.८, वर्धा १४.२.