७५ व्या स्वातंत्र्यदिनी ‘भारत माता की जय’चा नारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:17 AM2021-08-17T04:17:51+5:302021-08-17T04:17:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : देशाचा ७५ स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त पुणे शहरातील विविध संस्था, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : देशाचा ७५ स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त पुणे शहरातील विविध संस्था, संघटना आणि राजकीय पक्षांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
गृहरक्षक दलाचे माजी जिल्हा समादेशक ॲड. भारत एन. चव्हाण यांच्या हस्ते हडपसर येथील ससाणेनगर येथ झेंडावंदन करण्यात आले. यावेळी अविनाश काळे, भास्कर राठोड, सोनु बोराटे, राज चव्हाण, अमोल अमरोळ, सुभाष निकम, भरत वेदपाठक उपस्थित होते.
ताज फाऊंडेश इंडिया :
सदाशिव पेठ येथील ताज हाऊस येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त अध्यक्ष ॲड. रफिक शेख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांसाठी यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. दीपक शिरवळकर, डॉ. गिरीश चरवड, डॉ. राजू वाटवे, बी. आर. शेडगे, गणेश कासरूंग, संजय बावळेकर उपस्थित होते.
स्व. एस. एस. धोत्रे फाऊंडेशन :
शिवाजीनगर येथे विधी समितीचे अध्यक्ष दत्ता बहिरट यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी धोत्रे यांच्या स्मरणार्थ रिक्षा स्टँडचे उद्घाटन केले. रिक्षाचालकांना कोरोना योद्धा प्रमाणपत्र वाटप केले. यावेळी शहर कँाग्रेस कमिटीचे चिटणीस संजय मोरे, सेवादलचे हरिदास अडसूळ, राजाभाऊ चव्हाण, सूरज उकरिंडे, रिक्षा संघटनेचे अध्यक्ष दिलीप लोळगे, अविनाश बहिरट, संजय डोंगरे उपस्थित होते.
पुणे महिला मंडळ पर्वती :
मंडळाच्या अध्यक्षा केतकी कुलकर्णी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी स्मिता इनामदार, पुष्पा कोळपे, वैशाली देशमुख, अर्चना कोकजे, स्मिता काणे तसेच मंडळाच्या १० शाखांच्या पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य जनता दल (धर्मनिरपेक्ष) :
राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते प्रकाश डोबाळे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. सहकारनगर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक यांच्या हस्ते सलमान खान पठाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अशोक गायकवाड, विशाल गद्रे, इब्राहम यवतमाळवाले, हनुमान ननावरे, शिवदास डोईफोडे, महेश लागारे, सुनिता दोडकर, ॲड. शाबीर खान उपस्थित होते.
रोटरी क्लब ऑफ फॉर्च्यून :
एचआयव्ही बाधित मुलांसाठी कार्य करणारी संस्था मानव्य (भूगाव) येथे झेंडावंदन कार्यक्रम घेण्यात आला. तसेच संस्थेसाठी दहा हजार रूपयांची मदत करण्यात आलीे. विद्यार्थ्यांना खाऊवाटप करण्यात आले. यावेळी मुख्य संचालक शिरीष लवाटे, रोटरी क्लब ऑफ फॉर्च्यूनचे अध्यक्ष डॉ. दीपक तोष्णीवाल उपस्थित होते.
शिवसेना पर्वती विभाग :
तळजाई टेकडी येथे वृक्षारोपण करण्यात आले. विधानसभेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्हिडिओ काॅन्फरन्सद्वारे कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. यावेळी गजानन थरकुडे, संजय मोरे, बाळासाहेब ओसवाल, श्रीकांत पुजारी, डॉ. सचिन पुणेकर अर्जुनराव जानगवळी, सूरज लोखंडे, अमोल रासकर उपस्थित होते.
समाज विकास मंडळ (ट्रस्ट) :
पत्र्या मारूती मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत अनगळ यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. मुलांना खाऊवाटप करण्यात आले. यावेळी तुकाराम वैराट, राजेंद्र काकडे, नीलेश वैराट, विजय कोठाळे, संतोष वैराट, राजीव मिश्रा, चंद्रकांत भोंडे, रोहित वैराट उपस्थित होते.
अखिल ब्राम्हण मध्यवर्ती संस्था :
विरंगुळा केंद्राचा १० वा वर्धापन दिन तसेच स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या चार ज्येष्ठांचा सत्कार यावेळी करण्यात आला. यावेळी हेमंत आपटे, पुरूषोत्तम काशिकर, मधुकर दाबक, बाबूजी मिसाळ उपस्थित होते.
सलिम बाबा यूथ फाऊंडेशन :
दरड कोसळून नुकसानग्रस्त महाड येथील तळीये या गावासाठी आर्थिक मदत देण्यात आली. यावेळी उम्मी कुरेशी, गणेश भोकरे, जावेद कुरेशी, सोहेल बागवान, इम्रान शेख, उल्काताई तिकोणे, राकेश नाणेकर उपस्थित होते.