बॅग चोरताना एक लहान मुलगा सीसीटीव्हीत कैद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 02:39 AM2018-05-07T02:39:34+5:302018-05-07T02:39:34+5:30
मुख्य बाजारपेठेत होलसेल व्यापाऱ्यांची महत्त्वाची बिले व रोख २२ हजार रक्कम असलेली बॅग चोरट्याने भरदुपारी पळवून नेल्याचे घटना घडली आहे. ही बॅग चोरताना एक लहान मुलगा सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
यवत - येथील मुख्य बाजारपेठेत होलसेल व्यापाऱ्यांची महत्त्वाची बिले व रोख २२ हजार रक्कम असलेली बॅग चोरट्याने भरदुपारी पळवून नेल्याचे घटना घडली आहे. ही बॅग चोरताना एक लहान मुलगा सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
याबाबतची फिर्याद वैभव प्रकाश बरमेचा (वय ३३ वर्षे, रा. सातववाडी, हडपसर, पुणे) यांनी यवत पोलिसांत दिली आहे. काल वैभव बरमेचा त्यांच्या पिकअप जीपमधून यवत गावातील किराणा माल विक्रेत्या व्यापाºयांना माल देण्यासाठी आले होते. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास नीलेश जैन यांच्या किराणा मालाच्या दुकानासमोर त्यांच्या मालाच्या जीपसह थांबले असताना एका मुलाने त्यांना तेथे येऊन त्यांच्या जीपच्या चाकाची हवा जात असल्याचे सांगितले. त्यांनी तातडीने जीप रस्त्यामधून बाजूला घेऊन चाक बदलण्यासाठी बॅग गाडीत ठेवून काम सुरू केले. मात्र, काही वेळात त्यांनी गाडीत ठेवलेली बॅग गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी आजूबाजूला शोध घेतला असता बॅग चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या वेळी गावातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता जीपच्या हवा सोडणारा मुलगा आणि व्यापाºयाला हवा जात असल्याचे सांगणारा मुलगा तोच होता.
याचबरोबर बॅग चोरून घेऊन जात असतानादेखील तोच मुलगा कॅमेरामध्ये दिसतो आहे. मागील आठवडे बाजारात गावातील सराफी दुकानात बॅगमधून रोख रक्कम व दागिने असा सुमारे ४५ हजार रुपयांचा माल चोरीला गेला होता. या आठवड्यात परत व्यापाºयाची बॅग चोरीला गेल्यामुळे गावातील
व्यापारी पेठेत काळजी व्यक्त केली जात आहे.अशा चोºया करणाºया व्यक्तीचा तातडीने शोध घेण्याची मागणी व्यापारीवर्गातून केली जात आहे.