पुणे स्थानक परिसरात आता ब्रँडेड पदार्थांचे छोटे दालन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:11 AM2021-05-13T04:11:59+5:302021-05-13T04:11:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : लवकरच प्रवाशांना व नागरिकांना पुणे रेल्वे स्थानक परिसरात ब्रँडेड वस्तूची खरेदी करता येणार आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : लवकरच प्रवाशांना व नागरिकांना पुणे रेल्वे स्थानक परिसरात ब्रँडेड वस्तूची खरेदी करता येणार आहे. यात खाद्यपदार्थांपासून दैनंदिन गरजेच्या वस्तूचा समावेश असेल. आयआरएसडीसीच्या वतीने भाडे तत्त्वावर येथील दुकाने देऊन ही सुविधा सुरू करणार आहे. मात्र यासाठी किमान एक ते दोन महिन्यांचा कालावधी लागेल.
रेल्वे स्थानक म्हटल की, प्रवाशांची गर्दी, रेल्वेचा हॉर्न, गाडी पकडण्यासाठीची लगबग, असेच चित्र पाहायला मिळते. मात्र पण यातूनही थोडी उसंत मिळावी, थांबून गप्पा मारता यावा, भूक शमविण्यासाठी सोबतीला लज्जतदार पदार्थ असे ज्यांना वाटत असेल त्यांच्यासाठी पुणे स्थानक चांगला पर्याय ठरू शकते. या ठिकाणी १० छोटी दुकाने असतील. येथे तुम्हाला प्रवासाला लागणाऱ्या वस्तू पासून तुम्हाला दैनंदिन जीवनात उपयोगी पडणाऱ्या वस्तूची खरेदी करता येणार आहे. आयआरएसडीसीकडून हे काम केले जात आहे.