दुर्गम भागातील महिलांसाठी लघुउद्योग उभारावेत : आयुष प्रसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:08 AM2021-06-22T04:08:05+5:302021-06-22T04:08:05+5:30
यावेळी ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा राजवर्धिनी जगताप, गटविकास अधिकारी अमर माने, गावचे सरपंच गणेश जगताप उपस्थित होते. कोरोनाच्या विळख्यातून बाहेर ...
यावेळी ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा राजवर्धिनी जगताप, गटविकास अधिकारी अमर माने, गावचे सरपंच गणेश जगताप उपस्थित होते.
कोरोनाच्या विळख्यातून बाहेर पडून २८ दिवसांत कोरोनामुक्त गाव केलेल्या काळदरी गावाला आयुष प्रसाद यांनी भेट दिली. परिसराची भौगोलिक परिस्थिती पाहता येथे शेती व शेतीवर आधारित उद्योग-व्यवसाय करावेत नैसर्गिक साधनसंपत्ती अभ्यास करून कृषी पर्यटनाबरोबर लघुउद्योगांची निर्मिती या परिसरात झाल्यास येथील नागरिकांचे स्थलांतर थांबवण्यासाठी मदत होणार असून या कामाला जिल्हा परिषदेच्या वतीने सर्व मदत पुरवण्याचे आश्वासन देऊन आयुष प्रसाद कोरोनामुक्त गाव केल्याबद्दल गावकऱ्यांचे आभार मानून कौतुक केले.
गाव शंभर टक्के कोरोनामुक्त करून ४५ वर्षांवरील ९८ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले असल्याचे सरपंच गणेश जगताप यांनी सांगितले. काळदरी परिसरातील माती व वातावरणाचा विचार केला असता या परिसरात अंबा, काजू आदी फळबागांची लागवड करण्यासाठी भरीव तरतूद करून शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याची मागणी सरपंच गणेश जगताप यांनी करून महिला व तरुणांसाठी लघुउद्योग उभारण्याच्या कामात पुढाकार घेणार असल्याचे आश्वासन दिले. गणेश जगताप यांच्या हस्ते आयुष प्रसाद यांचा नागरी सत्कार करण्यात आला. या वेळी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय झुरंगे, सभापती नलिनी लोळे, उपसरपंच अनिता कारकर, ग्रामसेवक काशीपती सुतार, हरिभाऊ लोळे, ग्रामपंचायत सदस्य अशोक भगत, देविदास यादव, प्रशांत शेंडकर,शरद कारकर, अंकुश पिसाळ, अतुल थोपटे, पांडुरंग जाधव आदी ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काळदरी (ता.पुरंदर) येथे आयुष प्रसाद यांनी सरपंच गणेश जगताप व ग्रामपंचायत सदस्यांशी संवाद साधला.