विद्यार्थ्यांना स्मार्ट शिक्षणाचे धडे, पालकांचा सकारात्मक प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 02:41 AM2018-01-03T02:41:13+5:302018-01-03T02:41:21+5:30
शाळांव्यतिरिक्त किंवा शिक्षकांच्या मदतीशिवाय विद्यार्थी आपल्या घरच्या टीव्हीवर आणि पालकांच्या स्मार्ट फोनवर रंजक पद्धतीने कसे अध्ययन करू शकतात, या संकल्पनेवर आधारित डीआयईसीपीडी, पुणे या संस्थेत आयटी विभागात कार्यरत असलेले
टाकळीहाजी - शाळांव्यतिरिक्त किंवा शिक्षकांच्या मदतीशिवाय विद्यार्थी आपल्या घरच्या टीव्हीवर आणि पालकांच्या स्मार्ट फोनवर रंजक पद्धतीने कसे अध्ययन करू शकतात, या संकल्पनेवर आधारित डीआयईसीपीडी, पुणे या संस्थेत आयटी विभागात कार्यरत असलेले तंत्रस्नेही शिक्षक संदीप गुंड यांनी कार्यक्रम विकसित करून, त्याची टाकळीहाजी येथील माळवाडी या छोट्याशा गावात प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी केली.
या उपक्रमाच्या सुरुवातीला गावात एक प्रेरणासभा शिक्षण समितीचे अध्यक्ष सतीश भाकरे यांच्या उपस्थित घेऊन सर्वांना संकल्पना प्रात्यक्षिक स्वरूपात समजावून सांगण्यात आली. सर्वांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर, एक सर्व्हे केला गेला.
ज्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांच्या घरी टीव्ही व स्मार्ट फोन आहे. त्यांना स्क्रीन कास्टिंगचे डोंगल देण्यात आले. ज्याच्या मदतीने पालकांचा स्मार्ट फोन टीव्हीला जोडला गेला. प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरच्या स्मार्ट फोनवर इयत्तेनुसार अॅप्लिकेशन सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्यात आले आहे.
ज्यामध्ये मित्रा, जी-क्लास, बालभारती बुक एडिटर इत्यादी अॅन्ड्रॉइड अॅप्लिकेशनचा समावेश आहे. याबरोबर काही ब्रेन चॅलेंजिंग एजुकेशनल गेम्सचादेखील समावेश आहे.
दररोज सायंकाळी १ ते २ तास पालक-विद्यार्थ्यांना आपला फोन व टीव्हीचा ताबा देत आहेत. ज्यामुळे प्रत्येकघरात विद्यार्थी स्मार्ट फोनवर व घरातील टीव्हीवर स्मार्ट शिक्षणाचे धडे घेऊ लागले आहेत. दररोज सायंकाळी टीव्हीवरील मालिका, चित्रपटातील मनोरंजनात जाणारा वेळ आता डिजिटल शिक्षणासाठी चालला आहे.
याचबरोबर या उपकमांतर्गत एक अनोखी गोष्ट करण्यात आली. गावामध्ये एक कॉमन स्मार्ट लर्निंग झोन बनविण्यात आले.
ज्यासाठी गावातील मंदिराची निवड करण्यात आली. या मंदिरात एक इंटअॅक्टिव स्मार्ट टीव्ही बसवून मंदिराचा परिसर वाय-फाय करण्यात आला.
स्मार्ट टीव्हीमध्ये १ ली ते १२ वीपर्यंतचा डिजिटल अभ्यासक्रम, तसेच कहाँ सारे ब्रेन चॅलेंजिंग अॅप्लिकेशन टाकले गेले.
माळवाडी गावातील ग्रामस्त व शिक्षक यांच्या सहकार्याने तसेच शिक्षण सचिव नंदकुमार यांच्या संकल्पनेनुसार शिक्षण संचालक डॉ. सुनील मगर, विकास गरड, पुणे डायट प्राचार्य डॉ.कमलादेवी
औटी, शिक्षणाधिकारी शैलेजा दराडे यांच्या मार्गदर्शनाने या उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी करता आली, असे संदीप गुंड यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
ज्यामुळे सर्व विद्यार्थी आॅफलाइन असतानादेखील डिजिटल लायब्ररीतील कन्टेंट एकाचवेळी एक्सेस करत आहेत.
शालेय अभ्यासक्रमाबरोबर विद्यार्थ्यांच्या विविध कौशल्यांना वाव मिळेल. या प्रकारच्या कन्टेंटचा
समावेश डिजिटल लायब्ररीमध्ये करण्यात आला
आहे.
या कॉमन स्मार्ट लर्निंग झोनमुळे माळवाडी गावातील मंदिराला एक आगळवेगळ रूप आले आहे. हे मंदिर देशातील एकमेव असे मंदिर आहे. जेथे अध्यात्माबरोबर स्मार्ट शिक्षणाचे धडे गावातील विद्यार्थी व पालक घेत आहेत.या उपक्रमाची उपयुक्तता लक्षात घेऊन आदरणीय सचिव नंदकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच या उपक्रमाची राज्यभर अंमलबजावणी केली