स्मार्ट पुण्यातील स्मार्ट इन्व्हेस्टमेंट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:12 AM2021-09-03T04:12:33+5:302021-09-03T04:12:33+5:30

पुणे शहराने मोठ्या आयटी उद्योग समूहांना आवश्यक जागा आणि सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. हिंजवडी ते खराडी आणि मगरपट्टा ...

Smart Pune Smart Investment! | स्मार्ट पुण्यातील स्मार्ट इन्व्हेस्टमेंट!

स्मार्ट पुण्यातील स्मार्ट इन्व्हेस्टमेंट!

Next

पुणे शहराने मोठ्या आयटी उद्योग समूहांना आवश्यक जागा आणि सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. हिंजवडी ते खराडी आणि मगरपट्टा सिटी या भागात आयटी कॉरिडॉर पसरलेले आहे. भारताच्या आयटी उद्योगापैकी ८५% आयटी कंपनीची मुख्य कार्यालये पुण्यात आहेत. टेक स्टार्ट अपची पहिली पसंद पुणे असून जवळपास ३२०० टेक स्टार्ट अप कार्यरत आहेत. सेंटर फॉर अमेरिकन आन्त्रप्रेन्युअरशिपने पुण्याला ‘इमर्जिंग ग्लोबल स्टार्ट अप हब’ असे संबोधले आहे.

पुण्याची सध्याची लोकसंख्या ६५ लाखांच्या जवळपास आहे आणि वार्षिक वाढ २-३% आहे. २०३० पर्यंत पुण्याची लोकसंख्या एक कोटीच्या आसपास असेल. वाढत्या लोकसंख्येसोबत निवासी आणि व्यापारी संकुलांची मागणी सातत्याने वाढत आहे. दुकान, ऑफिस यांची संख्या देखील तेवढीच आवश्यक आहे. युवावर्गाचे उत्पन्न आणि त्यांची खर्च करण्याची क्षमता लक्षात घेता अनेक नव्या व्यवसायांना इथे संधी उपलब्ध झाल्या आहेत. रिटेल मार्केट वाढते आहे, या विकासाच्या घोडदौडीला कोविड-१९ च्या संकटाने थोडी खीळ बसली. मात्र, आता घर खरेदी करण्याची इच्छा असलेल्यांसाठी आता खूप मोठी संधी आहे. सध्या प्रॉपर्टीच्या किमती मूळ किमती इतक्याच आहेत. बिल्डर्स विविध योजना ग्राहकांना देत आहेत. कर्जाचे दर, स्टँप ड्यूटीमधील सवलत यामुळे आता प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे.

गुंतवणूक नक्की कोणत्या प्रकारच्या प्रॉपर्टीमध्ये करायची? हे नीट लक्षात घेणे गरजेचे आहे. कारण निवासी जागा आणि व्यावसायिक जागा असे दोन्ही पर्याय आपल्यासमोर उपलब्ध असतात. पूर्वी मध्यमवर्गीय निवासी जागा घेण्याला प्राधान्य देत होते. पण आता परिस्थिती बदलली आहे, आता लोक त्यांच्या गुंतवणुकीवर अधिक परतावा, भाडे कमवायला नावाजलेल्या बिल्डरच्या ग्रेड ए बिल्डिंगमधील छोट्या ऑफिसच्या जागा निवडतात. कारण व्यावसायिक जागेतून येणारे भाडे हे निवासी जागेतून मिळत असलेल्या भाड्याच्या २ ते ३ पट अधिक आहे. छोटे व्यावसायिक, आयटी स्टार्ट अप कंपनी यांना व्यवसाय चालू करण्यास जागेची गरज असते. पण भांडवलाचा अभाव असल्याने ते भाड़ेतत्वावर जागा घेण्यास प्राधान्य देतात. म्हणूनच व्यावसायिक जागेत गुंतवणूक करून आपली जागा अशा स्टार्ट अपला भाड्याने देणे हा सेकंड इनकम म्हणून अनेक छोटे गुंतवणूकदार विचार करतात. आरबीआयने बदललेल्या नियमानुसार कमर्शिअल लोन कमी व्याजदरात म्हणजे साधारण ८-९% व्याजदरात उपलब्ध आहेत. फ़क्त २०% रक्कम भरून उर्वरित ८०% रक्कम कर्ज स्वरूपात कोणतीही बँक अथवा वित्तसंस्था देऊ शकते. अजून २-३ वर्षांनी प्रॉपर्टी मार्केट पुन्हा वधारण्यास सुरुवात होईल तेव्हा या प्रॉपर्टीच्या गुंतवणुकीवर अधिक परतावा नक्कीच मिळेल. व्यावसायिक जागांचे भाव साधारण १८-२०% वाढतील.

Web Title: Smart Pune Smart Investment!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.