पीएमपीची सेवा हवी स्मार्ट

By admin | Published: July 17, 2017 04:22 AM2017-07-17T04:22:01+5:302017-07-17T04:22:01+5:30

दिल्लीसारख्या शहरात बस वाहतुकीच्या अतिशय चांगल्या सुविधा पाहायला मिळतात. तेथे शटल लगेच उपलब्ध असतात आणि हव्या

Smart service for PMP | पीएमपीची सेवा हवी स्मार्ट

पीएमपीची सेवा हवी स्मार्ट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : दिल्लीसारख्या शहरात बस वाहतुकीच्या अतिशय चांगल्या सुविधा पाहायला मिळतात. तेथे शटल लगेच उपलब्ध असतात आणि हव्या त्या ठिकाणी वेळेत व सुरक्षित पोहोचवतात, अशा सुविधा पुणे शहरात दिसत नाही. काळाची गरज आणि मागणीप्रमाणे नागरिकांना बसची सुविधा मिळायला हवी. पीएमपीचा दर्जा सुधारायला हवा तसेच जुन्या बसेस बंद व्हायला हव्यात. नियोजित वेळेत, स्वच्छ आणि सुरक्षित बससेवा पुण्यासारख्या स्मार्ट शहरात असायला हवी, असे प्रतिपादन स्मार्ट सिटीचे मुख्य
कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप यांनी केले.
पीएमपी प्रवासी मंचतर्फे स्मार्ट पुणे-स्मार्ट व सुरक्षित पीएमपी हा विषय घेऊन इंद्रधनुष्य सभागृह येथे पीएमपी प्रवासी मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. मंचाचे अध्यक्ष जुगल राठी, विवेक वेलणकर, संजय शितोळे, सतीश चितळे, यतीश देवाडिया यावेळी उपस्थित होते. यावेळी पीएमपीकडे सर्वाधिक तक्रारी नोंदविणाऱ्या अनिल घुले, रोहन निघोजकर, निळकंठ मांढरे, यतिश देवाडिगा, जयदीप साठे, वैभव कामथ, माधुरी जाधव, देवधर, दत्तानंद कुलकर्णी, विपुल पाटील यांना मोफत पास देऊन सन्मान करण्यात
आला.
पीएमपी सक्षम व्हावी, यासाठी पीएमपीच्या समस्या व्यंग्यचित्रांच्या माध्यमातून मांडणारे ज्येष्ठ व्यंग्यचित्रकार मंगेश तेंडुलकर यांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.
राजेंद्र जगताप म्हणाले, पीएमपीच्या अ‍ॅप सोबतच बसस्टॉपवर देखील बसबाबत माहिती असायला हवी. देशातील कोणत्याही शहरात बस वापरासाठी एकच युनिव्हर्सल कार्ड असायला हवे, तंत्रज्ञानाच्या वापराने हे शक्य आहे. इलेक्ट्रॉनिक बसदेखील वापरात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी प्रथम प्राथमिक स्तरावर बस आणल्या जातील. या बस ८ ते ९ तास चालतात. तसेच एका वेळी ३०० किलोमीटर अंतर जाऊ शकतात.
मोहन सीतापुरे म्हणाले, की डीएसके विश्व धायरी येथे जवळपास २५ हजार रहिवासी आहेत. मध्यवस्तीतून तेथे जाणाऱ्या बस बंद करण्यात आल्या आहेत. या बस त्वरित सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी मूकबधिर प्रवाशांनीदेखील आपल्या समस्या मांडल्या

Web Title: Smart service for PMP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.