स्मार्ट पुण्यातील स्मार्ट चाेर ; सत्संगाच्या नावाखाली करत हाेते घरफाेडी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 05:01 PM2019-02-07T17:01:25+5:302019-02-07T17:06:16+5:30

पुण्यातील चाेरांनी चाेरी करण्यासाठी स्मार्ट क्लुप्त्या वापरण्यात सुरुवात केली आहे. सत्संग शिबिरामध्ये राहुन सत्संगी असल्याचा बनाव करुन दाेघांनी शहरात घरफाेड्या करत तब्बल 11 लाख रुपयांचा माल लंपास केल्याचे उघडकीस आले आहे.

smart thief of smart pune ; was doing robbery on the name of mediation | स्मार्ट पुण्यातील स्मार्ट चाेर ; सत्संगाच्या नावाखाली करत हाेते घरफाेडी

स्मार्ट पुण्यातील स्मार्ट चाेर ; सत्संगाच्या नावाखाली करत हाेते घरफाेडी

पुणे :  पुण्यातील चाेरांनी चाेरी करण्यासाठी स्मार्ट क्लुप्त्या वापरण्यास सुरुवात केली आहे. सत्संग शिबिरामध्ये राहुन सत्संगी असल्याचा बनाव करुन दाेघांनी शहरात घरफाेड्या करत तब्बल 11 लाख रुपयांचा माल लंपास केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी हडपसर पाेलिसांनी कारवाई करत सागर दत्तात्रेय भालेराव (वय 21,रा. मांजरी हडपसर) आणि स्वप्निल नामदेव गिरमे (वय 24 रा. हजपसर) यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 131 ग्रॅम साेन्याचे दागिने, 5 दुचाकी, 10 माेबाईल फाेन, 2 एलसीडी, 1 कॅमेरा, 26 रुपये राेख असा 11 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

हडपसर पाेलीस स्टेशनच्या हद्दीत घरफाेड्या आणि चाेऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याने पाेलीस चिंतेत हाेते. पाेलिसांना गाेपनिय सूत्राकडून माहिती मिळाली की, आळंदी येथे सत्संग शिबीरामध्ये राहणारे दाेघेजण हे हडपसर भागात चाेऱ्या करत असून ते चाेरीचे साेने विकण्यासाठी आज हडपसर मार्केटमध्ये येणार आहेत. पाेलिसांनी सापळा रचून सागर आणि स्वप्निल याला ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतल्यानंतर त्यांच्याकडे साेन्याचे दागिने मिळून आले. त्यांच्याकडे अधिक चाैकशी केली असता त्यानी ते दागिने हडपसर भागातून चाेरले असून ते विकण्यासाठी मार्केटला आल्याचे सांगितले. आराेपी हे रेकार्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर शहर व परिसरात चाेरी व घरफाेडीचे गुन्हे दाखल आहेत. पाेलिसांनी त्यांच्याकडे अधिक चाैकशी केल्यानंतर काेणाला संशय येवू नये म्हणून दाेघे आळंदी येथील एका संस्कार शिबिरामध्ये गेल्या दाेन महिन्यांपासून प्रवेश घेऊन राहत असल्याचे सांगितले. तसेच सुट्ट्यांच्या दिवशी भाजीपाला आणण्याच्या बहाण्याने बाहेर पडून शहरात घरफाेड्या व चाेऱ्या करत हाेते. पाेलिसांनी दाेघांना अटक केली आहे. 

 

Web Title: smart thief of smart pune ; was doing robbery on the name of mediation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.