भोरमधील ७१ शाळांना स्मार्ट टीव्ही संच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:11 AM2021-04-09T04:11:33+5:302021-04-09T04:11:33+5:30

शिवतरे म्हणाले की, मार्च २०२० पासून कोविड या संसर्गजन्य आजारामुळे शाळा बंद असून आनलाइन शिक्षण सुरु आहे. ...

Smart TV sets for 71 schools in Bhor | भोरमधील ७१ शाळांना स्मार्ट टीव्ही संच

भोरमधील ७१ शाळांना स्मार्ट टीव्ही संच

Next

शिवतरे म्हणाले की, मार्च २०२० पासून कोविड या संसर्गजन्य आजारामुळे शाळा बंद असून आनलाइन शिक्षण सुरु आहे. आनलाइन शिक्षण देण्यासाठी लागणारी उपकरणे , माध्यमे यांना मोठे महत्व आहे.मात्र याचीच शाळांमध्ये उणीव असल्याने शाळांना ई लर्निंग टीव्ही संच देण्याचा निर्णय पहिल्यांदाच घेण्यात आला असून पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांना ४३ स्मार्ट टीव्हीचे संच उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत अशी माहिती देऊन रणजीत शिवतरे पुढे म्हणाले की, इंटरनेटचा वापर करून विविध प्रकारचे अभ्यासक्रमांशी संबंधित शैक्षणिक साहित्य डाऊनलोड करुन विद्यार्थ्यांना दाखवता येणार आहे. त्याचप्रमाणे मोबाईल टी.व्हीला जोडून मोबाईलमधे असणारे शैक्षणिक व्हिडीओ यूट्युबवर असणाऱ्र्या दिशा ॲपमधील व शिक्षकांनी तयार केलेले शैक्षणिक व्हिडीओ विद्यार्थ्यांना दाखवल्यास विद्यार्थ्यांना सहजपणे अभ्यास समजला जाईल, त्याचप्रमाणे दुसऱ्र्या देशातील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी वापरले जाणारे तंत्रज्ञान याची माहिती घेऊन त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना शिक्षण देणे सोपे होणार आसून त्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यास मदत होणार असल्याचा विश्वास रणजीत शिवतरे यांनी सांगितले.

Web Title: Smart TV sets for 71 schools in Bhor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.