भुकूम ग्रामपंचायतीला 'स्मार्ट ग्राम' पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:10 AM2021-02-24T04:10:52+5:302021-02-24T04:10:52+5:30
पुणे येथील अल्प बचत भवनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विद्यमान सरपंच रेखा योगेश ...
पुणे येथील अल्प बचत भवनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विद्यमान सरपंच रेखा योगेश वाघ, माजी सरपंच नितीन कुढले, ग्रामसेवक भागवत यादव यांनी हा पुरस्कार स्वीकारला, तर यामध्ये सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्र आणि दहा लाख रुपये बक्षीस असे या पुरस्काराचे स्वरूप आहे
मुळशी तालुक्यामध्ये एकूण ९५ ग्रामपंचायती असून, या सर्वांमधून २०१८-१९ या सालातील 'सुंदर गाव पुरस्कार' हा भुकूम गावाला मिळालेला आहे.
पुणे जिल्हा परिषदेकडून स्मार्ट ग्राम योजने अंतर्गत दिल्या जाणाऱ्या पुरस्काराची घोषणा नुकतीच करण्यात आली होती. यामध्ये स्थानिक प्रशासन आणि तत्कालीन सरपंच नितीन कुढले, उपसरपंच व इतर सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी गावस्तरावर राबविलेल्या विविध शासकीय योजना, नागरी सुविधा, आरोग्य,शिक्षण, कचरा,सांडपाणी,आधुनिक तंत्रज्ञान अशा विविध स्तरावर केलेल्या उल्लेखनीय कामागिरीमुळेच सन २०१८-२०१९ साठीचा सुंदर गाव पुरस्कार हा भुकूम गावाला भेटला आहे.
फोटो ओळ :उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना सरपंच रेखा वाघ, माजी सरपंच नितीन कुढले व ग्रामसेवक भागवत यादव.