पिरंगुट ग्रामपंचायतीला ‘स्मार्ट ग्राम पुरस्कार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:12 AM2021-02-25T04:12:07+5:302021-02-25T04:12:07+5:30
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून स्मार्ट ग्राम तथा आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार ...
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून स्मार्ट ग्राम तथा आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार दिला जातो. तेव्हा पिरंगुट ग्रामपंचायतीला सन २०१९-२० साठी हा तालुकास्तरीय स्मार्ट ग्राम पुरस्कार मिळालेला आहे. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि दहा लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
यावेळी आमदार सुनील शेळके, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजित शिवतरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रमोद काकडे, कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती बाबूराव वायकर, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पूजा पारगे, समाज कल्याण समितीच्या सभापती सारिका पानसरे, अतिरिक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर आदी उपस्थित होते.
फोटो ओळ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सरपंच चांगदेव पवळे व ग्रामसेवक डी. डी. भोजणे यांनी पुरस्कार स्वीकारला.